काळवीट शिकार प्रकरणातून वाचू शकतो सलमान मात्र ....

20 वर्षापूर्वी घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणाबाबत आज जोधपुर कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अभिनेता सलमान खानला कोर्टाने दोषी ठरवलं असून इतर 5 कलाकारांना निर्दोष मुक्त केलं आहे. या प्रकरणातून सलमान खान तुरूंगात जाण्यापासून वाचून शकतो. मात्र यासाठी एक सर्वात मोठी अडचण आहे. 

Dakshata Thasale Updated: Apr 5, 2018, 12:00 PM IST
काळवीट शिकार प्रकरणातून वाचू शकतो सलमान मात्र .... title=

मुंबई : 20 वर्षापूर्वी घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणाबाबत आज जोधपुर कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अभिनेता सलमान खानला कोर्टाने दोषी ठरवलं असून इतर 5 कलाकारांना निर्दोष मुक्त केलं आहे. या प्रकरणातून सलमान खान तुरूंगात जाण्यापासून वाचून शकतो. मात्र यासाठी एक सर्वात मोठी अडचण आहे. 

जर सलमान खानला 3 वर्षाकरता दोषी ठरवलं गेलं तर त्याला तुरूंगात जावे लागेल. सलमान तेथीलच खालील कोर्टात बेल बॉन्ड भरून शिक्षा सस्पेंड करू शकतो. मात्र 30 दिवसांत सलमानला सेशन कोर्टात ही शिक्षा सस्पेंड करावी लागेल. या अगोदरच्या 3 प्रकरणात सलमान खानची सुटका झाली आहे. ही प्रकरण उच्च न्यायालयात आहेत. 

 किती वर्षांची शिक्षा होण्याचा अंदाज ? 

 ऑक्टोबर १९९८ रोजी मध्यरात्री दोन काळवीटांची  शिकार केली, असा सलमानवर आरोप ठेवण्यात आलाय. सलमानवरील हा सिद्ध झाल्यास त्याला सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते.  सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.  काळवीट शिकार प्रकरण - सलमान खानच्या शिक्षेवर बॉलिवूडचे 500 कोटी अवलंबून

आसाराम बापूंसोबत राहणार? 

सलमान खानला शिक्षा झाल्यास त्याची रवानगी जोधपूर सेंट्रल जेलमध्ये होऊ शकते. येथेच लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसाराम बापूदेखील आहेत. त्यांच्या बाजूच्या बॅरॅकमध्ये सलमान खानला ठेवण्याची शक्यता आहे.