'राधे' चित्रपटात सलमान-दिशामध्ये रंगणार रोमान्स

बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांबद्दल चांगलाच चर्चेत आहे.

Updated: Nov 2, 2019, 02:48 PM IST
'राधे' चित्रपटात सलमान-दिशामध्ये रंगणार रोमान्स title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांबद्दल चांगलाच चर्चेत आहे. त्याचा आगामी 'दबंग ३' चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले. 'दबंग ३' चित्रपटासोबतच सलमान त्याच्या 'राधे' चित्रपटामध्ये देखील व्यस्त आहे. चित्रपटाची शूटींग सध्या जोरदार सुरू आहे.

त्याचबरोबर चित्रपटासंबंधीत आणखी एक गोष्ट समोर आली आहे. सलमानने त्याच्या सोशल मीडियावरून एक फोटो पोस्ट केला आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये संपूर्ण चित्रपटाची कास्ट समोर आली आहे. चित्रपटात सलमानसोबत पुन्हा एकदा अभिनेत्री दिशा पाटनी भूमिका साकारणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

And the journey begins . . . #RadheEid2020 @sohailkhanofficial @apnabhidu @dishapatani @randeephooda @prabhudheva @atulreellife @nikhilnamit @skfilmsofficial @reellifeproduction

 

दिशा आणि सलमान त्यांच्या आगामी 'राधे' चित्रपटात रोमान्स करताना दिसणार आहे. 'भारत' चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. 'राधे' चित्रपटाच्या कास्टसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील घोषित करण्यात आली आहे. 

'राधे' येत्या वर्षात ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने सोशल मीडियावर चित्रपटाच्या तारखेची घोषणा केली होती. सोहेल खान 'राधे' चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 

तर 'राधे'मधून सलमान आणि प्रभु देवा तिसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. प्रभुदेवा यांनी सलमानच्या 'वॉन्टेड' आणि आगामी 'दबंग ३' चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं आहे.