बीसीसीआयवर दिया मिर्झाची आगपाखड

महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करत ओढले ताशेरे 

Updated: Nov 2, 2019, 02:33 PM IST
बीसीसीआयवर दिया मिर्झाची आगपाखड  title=

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा ही कायमच तिच्या भूमिका सर्वांसमोर मांडत आली आहे. मुद्दा कोणताही आणि कितीही गंभीर असो त्यावर दियाने नेहमीच तिची ठाम भूमिका मांडली आहे. सध्याच्या घडीला दियाने थेट बीसीसीआयला निशाण्यावर घेतलं आहे. दिल्लीत भारत विरुद्ध बांग्लादेशमधील सामन्याचं आयोजन करण्याच्या मुद्द्यावरुन तिने ही प्रतिक्रिया दिली आहे. 

दिल्लीत सध्याच्या घडीला असणारं एकंदर प्रदूषण, अशुद्ध हवा हे सारं वातावरण पाहता बीसीसीआयकडून आयोजित करण्यात आलेल्या टी२० सामन्याच्या आयोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. #MyRightToBreathe #BreatheLife असे हॅशटॅगही तिने ट्विटमध्ये जोडले. 

दिवाळीच्या दिवसांपासूनत दिल्लीच्या प्रदूषणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवारी प्रदुषण पातळीचे हे आकडे ४५९वर पोहोचले होते. पंजाब आणि हरियाणामध्ये सतत सुरु असणारी शेतांतील आग, (धुमसणारा वणवा) आणि धुरके यांमुळे श्वसनयोग्य हवेचाही स्तर खालावत आहे. मुख्य म्हणजे सामन्यासाठी तेथे पोहोचलेल्या दोन्ही देशांच्या संघातील खेळाडूंनाही या त्रासाचा सामना करावा लागणार आहे. 

खेळाडूंना या प्रदूषणजोग्या वातावरणामुळे श्वसनाचा आणि डोळ्यांचा त्रास उदभवत आहे. शिवाय सामन्यादरम्यान धुरक्यांचं प्रमाण जास्त असल्याच मैदानात चेंडू दिसण्यासही काही अडचणी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ज्यामुळे दियाने चिंतातूर होत तिचा संताप व्यक्त केला.