मुंबई : अभिनेता सलमान खानने जिला बॉलिवूडमध्ये आणलं. अभिनेत्री ऐश्वर्या सारखी दिसत असल्याने ती चांगलीच चर्चेत आली. पण फार काळ ती बॉलिवूडमध्ये टिकू शकली नाही. ती म्हणजे अभिनेत्री स्नेहा उल्लाल . स्नेहा उल्लालने 'लकी: नो टाइम फॉर लव' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ऐश्वर्या सारखी दिसत असल्याने तेव्हा स्नेहा तुफान चर्चेत आली, पण फार काळ काही तिची जादू चालू शकली नाही. पण आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.
स्नेहाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. सलमानची अभिनेत्री स्नेहाची तुलना पुन्हा अभिनेत्री ऐश्वर्यासोबत होत आहे. रूपेरी पडद्यावर सक्रीय नसली तरी स्नेहा सोशल मीडियावर तुफान चर्चेत असते. स्नेहाने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती हुबेहूब ऐश्वर्या सारखी दिसत आहे. फोटोंमध्ये ऐश्वर्याने नव्या नवरीचे कपडे घातले आहेत.
स्नेहाने नुकताचं एक ब्रायडल फोटोशूट केलं आहे. तिने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. एका युझरने, 'तू हुबेहूब जोधा दिसत आहे असं लिहिलं आहे.' दुसरा युझर म्हणतो, 'तुझ्या या लूकमुळे ऐश्वर्याच्या जुन्या लूकची आठवण आली.'
स्नेहाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सलमानचा भाऊ सोहेल खानसोबत 'आर्यन' या चित्रपटात देखील तिने काम केलं होतं. पण हा चित्रपट बॉक्सऑफिसवर कमाल करु शकला नव्हता. बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याने स्नेहाने तेलगु चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. स्नेहाने 12 वर्षांमध्ये फक्त 6 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.