महाराष्ट्रातून जाणार भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग; चेन्नई एक्सप्रेसपेक्षा सुपरफास्ट प्रवास!

 दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे हा भारातातील सर्वात मोठा महामार्ग आहे. याच महामार्गाला टक्कर देणार देशातील दुसरा मोठा महामार्ग तयार केला जात आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे.   

वनिता कांबळे | Updated: Dec 26, 2024, 04:15 PM IST
महाराष्ट्रातून जाणार भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग; चेन्नई एक्सप्रेसपेक्षा सुपरफास्ट प्रवास!  title=

Surat-Chennai Expressway Route Map :  दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे (Delhi-Mumbai Expressway) हा भारतातील पहिला सर्वात मोठा महामार्ग आहे.  दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे 1350 KM लांब आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेला टक्कर देण्यासाठी भारतात आणखी एक मोठा महामार्ग उभारला जात आहे. सुरत-चेन्नई एक्सप्रेसवे हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग आहे  (India's Second Longest Expressway) . हा महामार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे. 

भारतमाला प्रकल्पांतर्गत देशभरातील 550 जिल्ह्यांमध्येअंदाजे 65 हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग आणि द्रुतगती मार्गांचे जाळे तयार केले जात आहे. यामध्ये, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग ठरला आहे. या महामार्गाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. 1350 किमी लांबीचा हा मार्ग सात राज्यांना जोडणारा आहे. सध्या मध्यप्रदेशातील 245 किमी मार्गावर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. देश-विदेशात  दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाची चर्चा आहे.  त्यातच आता भारतात दुसरा सर्वात लांब एक्सप्रेसवे उभारला जात आहे. 

हे देखील वाचा... कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गला जाताना आंबोली घाट लागणार नाही; चार तासांचा प्रवास फक्त एका तासांत पूर्ण होणार

सुरत-चेन्नई एक्सप्रेसवे हा 1271 KM लांबीचा भारतातील दुसऱ्या क्रमाकांचा मोठा महामार्ग बांधला जात आहे. या हायस्पीड महामार्गावर वाहने 120 किमी स्पीडने धावणार आहेत. भारताच्या दक्षिण टोकाला पश्चिमेशी जोडण्यासाठी हा महामार्ग उभारला जात आहे. विशेष म्हणजे भारताच्या दक्षिण टोकाला पश्चिमेशी जोडणाऱ्या या महामार्गाचा कनेक्टींग पाईंट महाराष्ट्रात आहे. म्हणजेच सुरत-चेन्नई एक्सप्रेसवेचा मध्यबिंदू महराष्ट्रात आहे. 

सुरत-चेन्नई एक्स्प्रेस वे 6 राज्यांतील अनेक शहरांना चेन्नई आणि सुरतशी जोडणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरत आणि चेन्नई या दोन शहरांशी थेट कनेक्टीव्ही मिळणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणरा आहे.  सुरत-चेन्नई द्रुतगती मार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ( NHAI ) द्वारे बांधला जात आहे. सध्या हा महामार्गावर फक्त 4 लेन तयार केले जाणार आहेत. भविष्यात ते 6 आणि नंतर 8 लेनपर्यंत वाढवले ​​जाणार आहेत. 

सुरत-चेन्नई एक्स्प्रेस वेच्या निर्मितीमुळे 1600 किमीचा प्रवास 1270 किमी अंतरावर होणार आहे. सध्या या प्रवाससाठी जवळपास 35 तास लागतात, परंतु हा एक्सप्रेस वे सुरू झाल्यानंतर हाच 35 तासांचा प्रवास फक्त 18 तासात होणार आहे. हा एक्सप्रेसवे गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि दुसरीकडे तामिळनाडू या सहा राज्यांतून जाणार आहे. त्याचबरोबर तिरुपती, कडप्पा, कुरनूल, कलबुर्गी, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिकसह अन्य काही प्रमुख शहरांना हा महामार्ग जोडणार आहे. या महामार्गामुळे सुरत टेक्सटाईल व्यापार चेन्नई आयटी हबशी जोडला जाईल. 

सुरत-चेन्नई एक्सप्रेसवेबाबत मोठी अपडेट 

महाराष्ट्रातील अहिल्या नगर आणि अक्कलकोट दरम्यान या महामार्गाच्या 234.5 किमी ग्रीनफिल्ड विभागाला पर्यावरण खात्याची मंजुरी मिळाली आहे.  NHAI ने एक्सप्रेसवेच्या या भागासाठी बांधकाम निविदा देखील मागवल्या आहेत.  या एक्सप्रेसवेचे कर्नाटक आणि तेलंगणा ग्रीनफिल्डचे कुर्नूल, आंध्र प्रदेश पर्यंतचे भाग आधीच पूर्णत्वाच्या जवळ आले आहेत. 2025 मध्ये  हा भागवाहतुकीसाठी खुले केले जाणार आहे. कुर्नूलच्या पलीकडे, या एक्स्प्रेसवेमध्ये ब्राउनफील्ड अपग्रेडेशनचा समावेश आहे, जो सध्या चालू आहे. सुरत ते अहिल्या नगर विभागाचे कामलाही गती मिळेल.