मुंबई : बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर या जोडीच्या नावावर अनेक हीट चित्रपटांची नोंद करण्यात आली आहे. जॉकी आणि अनिल यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण झाले ते म्हणजे चित्रपट 'राम लखन'च्या माध्यमातून. चित्रपटात दोघांनी ऑनस्क्रिन ब्रदर्सची भूमिका साकारली आणि चित्रपटांत दाखवण्यात आलेल्या भावांमधील प्रेमाला प्रेक्षकांनी देखील डोक्यावर घेतलं. आज देखील राम लखन चित्रपट तितक्याचं आवडीने लोक पाहतात.
'रान लखन' चित्रपटानंतर ही जोडी 'परिंदा' चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली. चित्रपटाचं दिग्दर्शन विधु विनोद चोप्रा यांनी केलं होतं. 2019 ऑक्टोबर रोजी 'परिंदा' चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण झाली. विधु विनोद चोप्रा यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये जॅकी आणि अनिल कपूर चित्रपटाबद्दल चर्चा करताना दिसत आहेत.
@AnilKapoor has always been a perfectionist when it comes to his shots. Here is @bindasbhidu sharing how it took 'hard' takes to get the final cut for one of #Parinda's scenes. #30YearsOfParinda@MadhuriDixit pic.twitter.com/yWpratNupx
— Vidhu Vinod Chopra Films (@VVCFilms) October 31, 2019
या चित्रपटातील काही महत्त्वाच्या गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत. त्यामधील एक म्हणजे जॅकीने अनिल कपूर यांना 17 वेळा कानशिलात लगावली होती. यावेळी जॅकी म्हणाले की, 'सीन अचूक करण्यासाठी मी अनिल यांच्या 17 वेळा कानशिलात लगावली. सीनमध्ये अनिल यांना सर्वांत चांगले भाव हवे होते. '
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर अनिल कपूर जॅकी श्रॉफपेक्षा काही महिन्यांनी मोठे आहेत. पण त्यांनी कामय छोट्या भावाची भूमिका साकारली. 2021मध्ये दोघांना 'मुंबई सागा' चित्रपटात चाहत्यांनी एकत्र अनुभवलं, त्यानंतर आता चाहते या जोडीच्या प्रतीश्रेत आहेत.