सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम करणार बॉलिवूडमध्ये इंट्री, पण हिरो म्हणून नाही तर...

सैफ अली खानने एका मुलाखतीत सांगितले.

Updated: Oct 1, 2021, 08:31 PM IST
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम करणार बॉलिवूडमध्ये इंट्री, पण हिरो म्हणून नाही तर... title=

मुंबई : आपण हे अनेकदा पाहिलं आहे की, जवळजवळ सगळ्याच बॉलिवूड स्टारची मुलं ही, चित्रपट सृष्टीत अभिनय क्षेत्रात प्रवेश करतात. परंतु सगळ्यांचेच नशीब त्यांना साथ देतंच असं नाही. काही स्टार किड्सला प्रेक्षकांना परद्यावर नापसंत देखील केलं, ज्यामुळे त्यांना या क्षेत्रातुन बाहेर पडावं लागलं, तर काही लोकं अजुनही स्ट्रगल करावं लागतं. तर खूप कमी स्टार किड्स असे आहेत, जे या चंदेरी दुनियेपासून लांब आहेत.

आताच एक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये असे सांगिले जात आहे की, लवकरत नवाब सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हा देखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की, तो अभिनेता म्हणून नाही तर एका वेगळ्याच रोलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सैफ अली खानने एका मुलाखतीत सांगितले की, इब्राहिम करण जोहरच्या आगामी चित्रपट 'रॉकी और राणी की प्रेम कहानी' मध्ये दिग्दर्शकाला सहाय्य करत आहे. म्हणजेच तो बॉलिवूडमध्ये एन्ट्री तर करत आहे पण असिस्टंट डिरेक्टर म्हणून.

इब्राहिमची बहिण सारा आली खान ने आधीच बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे आणि आता इब्राहिम देखील सज्ज झालेला आहे.

इब्राहिम असिस्ट करत असलेल्या 'रॉकी और राणी की प्रेम कहानी'मध्ये रणवीर आणि कटरीना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. इब्राहिम हा या चित्रपटासाठी करण जोहरला असिस्ट करणार आहे. एकूणच करण जोहर पुन्हा एकदा एका स्टार किडला बॉलिवूडमध्ये घेऊन येत आहे, फरक एवढाच आहे की त्याची भूमीका वेगळी असणार आहे.

इब्राहिम आता आपल्या स्टाईलने काम करुन बॉलिवू़डमध्ये आपली छाप पाडू शकतो की नाही, तसेच आपल्यासाठी जागा निर्माण करु शकतो की, नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.