Sai Pallavi च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अभिनेत्री लवकरच...

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे चाहते जी अपेक्षा करत होते ते आता खरं होताना दिसणार आहे.   

Updated: Dec 10, 2022, 10:39 AM IST
Sai Pallavi च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अभिनेत्री लवकरच... title=

Sai Pallavi and Ranbir Kapoor In A Flim : दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. साई पल्लवी तिच्या साधेपणा आणि सौंदर्यामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करते. चित्रपटातील साईच्या भूमिका या नेहमी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. दरम्यान, साईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साई पल्लवी लवकरच बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण करू शकते. साई पल्लवी लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) स्टारर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

हेही वाचा : 'राहा 20 वर्षांची झाल्यानंतर मी तिच्यासोबत...', Ranbir Kapoor ला सतावतेय लेकीची चिंता

रिपोर्ट्सनुसार साई पल्लवीला बॉलिवूड निर्माते मधु मंटेना यांनी त्यांच्या पौराणिक चित्रपट रामायणसाठी (Ramayan) विचारणा केली होती. या चित्रपटात ही अभिनेत्री सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर, चित्रपट स्टार रणबीर कपूर या चित्रपटात रामची भूमिका साकारू शकतो, असे म्हटले जात आहे. आता जर साईनं या चित्रपटासाठी होकार दिला तर तिच्या चाहत्यांसाठी ही खरंच एक आनंदाची बातमी असेल. (Ranbir as Ram and Sai as Sita)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, रामायण या पौराणिक कथेवर आधारित आदिपुरुष हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री क्रिती सेनन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच सैफ अली खान या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रावणाच्या भूमिकेच्या लूकवर आक्षेप घेतला आहे. आता चित्रपट निर्माते मधु मंटेना यांचा रामायणाच्या कथेवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल का हे पाहण्यासारखे आहे. साई पल्लवीला बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. (Sai Pallavi to play Sita in Madhu Mantena s Ramayan with Ranbir Kapoor)