रितेश का म्हणतोय 'बायकांना डोक्यावर बसवालं तर...' नक्की काय बिनसलंय ?

रितेश देशमुखनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Updated: Nov 7, 2022, 11:51 AM IST
रितेश का म्हणतोय 'बायकांना डोक्यावर बसवालं तर...' नक्की काय बिनसलंय ? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेश हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त चाहत्यांच्या संपर्कात राहतो. रितेशचे लाखो चाहते असून तो त्याच्या कॉमेडी आणि क्यूट अंदाजासाठी ओळखला जातो. रितेश फक्त चित्रपटात चाहत्यांचे मनोरंजन करत नाही तर खऱ्या आयुष्यातही त्याचा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे. रितेशनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत रितेशनं हेल्मेट आणि पत्नी या दोघांचे महत्त्व सांगितले आहे. 

हेही वाचा : Kamal Haasan Birthday : कमल हासन आहेत इतक्या कोटींच्या संपत्तीचे मालक, आकडा ऐकून व्हाल थक्क

रितेश देशमुखनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश बोलतो की हेल्मेट आणि पत्नी दोनोका स्वभाव सेम है, दोनोको सिर पर चढ़ा कर रखो आपकी जान बची रहेगी! रितेशचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रितेशनं शेअर केलेला व्हिडीओ येथे पाहा 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, रितेश हा बऱ्याचवेळा त्याची पत्नी जिनिलियासोबत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना दिसतो. त्या दोघांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्या दोघांची जोडी ही सोशल मीडियावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक घ्या. 

‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात रितेश आणि जिनिलियाने पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्याच निमित्ताने ते पहिल्यांदाच हैदराबाद विमानतळावर भेटले. मात्र यावेळी जिनिलियाचे वागणे रितेशला फार काही पटले नाही. त्याने स्वत:हून तिच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला मात्र जिनिलियाने त्याच्याकडे थोडेसे दुर्लक्ष केले. परंतु पुढे जसजसे एकमेकांना त्यांचा स्वभाव कळत गेले तसे त्यांच्यातले प्रेम खुलले. 2012 मध्ये ते लग्न बंधनाता अडकले. त्या दोघांना रियान आणि राहिल अशी दोन मुले आहेत.