मी कधी घरी परतेन? ऋषी कपूर यांची भावनिक पोस्ट

न्यूयॉर्कहून भारतात येण्यासाठी आणखी काही महिने लागणार

Updated: May 31, 2019, 06:28 PM IST
मी कधी घरी परतेन? ऋषी कपूर यांची भावनिक पोस्ट  title=

मुंबई : बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या वर्षी अचानक त्यांच्या इलाजासाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यांनी न्यूयॉर्कला जाण्याचं कारण स्पष्ट केलं नव्हतं. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी कॅन्सरच्या इलाजासाठी न्यूयॉर्कमध्ये असल्याचं सांगितलं. आज त्यांना इलाजासाठी जाऊन ८ महिने झाले असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. 

'आज मला न्यूयॉर्कमध्ये ८ महिने झाले आहेत. मी कधी घरी परते' अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

एका मुलाखतीत ऋषी कपूर यांनी आपल्या आजाराबाबत खुलेपणाने चर्चा केली होती. न्यूयॉर्कहून भारतात येण्यासाठी आणखी काही महिने लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं. अद्याप माझं बोन मॅरो ट्रान्सप्लांट बाकी असल्याचंही त्यांनी सांगितलं. या अशा वेळी पत्नी अभिनेत्री नीतू सिंह त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी असून माझी मुलं रणबीर आणि रिद्धिमाही माझ्या सोबत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

कलाविश्वातील अनेक कलाकार ऋषी कपूर यांना न्यूयॉर्कमध्ये भेटत असतात. त्यांच्यासोबतचे फोटोही ते सोशल मीडियावर शेअर करतात. 

'मंटो' या चित्रपटातून ६६ वर्षीय ऋषी कपूर यांनी भूमिका साकारली होती.