'टिप टिप बरसा पानी' गाण्यात रवीना नाही तर ही अभिनेत्री होती पहिली पसंत, पण तिचं अकाली निधन झालं

Divya Bharati Replace By Raveena Tandon: रविना टंडन ही अभिनेत्री सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु तिनं ज्या लोकप्रिय 'मोहरा' या चित्रपटातून काम केले होते त्यावेळी तो रोल तिला एका अभिनेत्रीच्या मृत्यूमुळे ऑफर झाला होता. परंतु त्यानंतर तिच्या करिअरला वेगळीच कलाटणी मिळाली होती. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 20, 2023, 02:01 PM IST
'टिप टिप बरसा पानी' गाण्यात रवीना नाही तर ही अभिनेत्री होती पहिली पसंत, पण तिचं अकाली निधन झालं title=
July 19, 2023 | raveena tandon was offered the role of divya bharti in mohra

Divya Bharati Replace By Raveena Tandon: सिनेचित्रपटसृष्टीत अनेकदा अनेक गोष्टी या घडताना दिसतात. त्यामुळे त्यांनी चांगलीच चर्चा होताना दिसते. त्यासोबत कधी कोणत्या चित्रपटासाठी कुठली अभिनेत्री रिप्लेस केली जाईल याचीही काहीच शाश्वती नसते. परंतु तुम्हाला कदाचित बॉलिवूडमध्ये झालेल्या अशाच एका या रिप्लेसमेंटबद्दल कदाचित माहितीही नसेल. अभिनेत्री रविना टंडन ही सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाचीही सतत चर्चा होताना दिसते. 90 च्या दशकात ही अभिनेत्री सर्वाधिक सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री होती. माधुरी दीक्षित, ऐश्वर्या, काजोल, दिव्या भारती, जूही चावला अशा अभिनेत्रींनाही ती टक्कर देत होती. त्यातून त्या काळात म्हणजे 90 च्या दशकाच्या सुरूवातीला दिव्या भारती ही अभिनेत्री सार्वधिक लोकप्रियतेच्या शिखरावर होती. परंतु तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिचे अनेक चित्रपट हे अपुर्णच राहिले होते. 

'मोहरा' हा चित्रपट तुम्हाला सर्वांनाच आठवत असेल. या चित्रपटातून अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री रविना टंडन होते. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होती. परंतु हा सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैैकी एक असलेला चित्रपट हा मात्र या सुपरस्टारला घेऊन झाला असता परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. आपल्याला या चित्रपटातून रविना टंडन जरी दिसली असलती तरीसुद्धा या चित्रपटाची ती पहिली पसंत नव्हती. तर या चित्रपटाची पहिली पसंत ही दिव्या भारती ही अभिनेत्री होती. परंतु तिच्या अचानक झालेल्या मृत्यूनं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. हा त्यातलाच एक चित्रपट होता जो तिचा अपुर्ण राहिला होता. 

हा चित्रपटाचे शुटिंग हे अक्षरक्ष: पाच दिवस झाले होते परंतु त्यानंतरच दिव्या भारतीचे निधन झाले होते. 5 एप्रिल 1993 साली अभिनेत्री दिव्या भारतीचे निधन झाले. यावर्षी या घटनेला 30 वर्षे पुर्ण झाली आहेत. परंतु हा चित्रपट दिव्या भारतीच्या नावानं नाही तर रविना टंडनच्या नावानं पुर्ण झाला. त्यानंतर रविनानंही हा चित्रपट पुर्ण करा. समोर आलेल्या माहितीनुसार असे समजते की, दिव्याच्या मृत्यूमुळे रविनाला घाईघाईनं चित्रपटात कास्ट करण्यात आले होते. परंतु तिला ही चित्रपटाची ऑफर आलीच ती दिव्याच्या मृत्यूमुळे. त्यामुळे हा चित्रपट तिच्यासाठीही एक कलाटणी देणारा ठरला. 

हेही वाचा - तुझ्यात जीव रंगला! राणादा पाठकबाईंना उचलून चढला जेजूरीच्या पायऱ्या.. Video व्हायरल

नक्की काय घडले होते? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक राजीव राय मोहरा या चित्रपटाचे कास्टिंग करत होते. तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर पहिलीच आली ती म्हणजे श्रीदेवी ही अभिनेत्री. परंतु तेव्हा श्रीदेवी ही आपल्या 'चंद्रमुखी' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होती. त्यामुळे तिनं हा चित्रपट नाकारला होता. त्यानंतर हा चित्रपट श्रीदेवीनं नाकारल्यामुळे तो त्यांनी अभिनेत्री दिव्या भारतीला दिला. तिनं होकार दिल्याबरोबर या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवातही झाली. परंतु शुटिंगच्या 5 दिवसांनी मात्र दिव्याचे निधन झाले आणि चित्रपटाचे शुटिंग थांबले.