'आम्ही इतके हरवलो होतो की खालून दगड...', रामलीलामधील किसिंग सीनवर पहिल्यांदाच बोलला रणवीर

Coffee With Karan Deepika Padukone and Ranveer Singh: सध्या चर्चा आहे ती म्हणजे रणवीर आणि दीपिकाची. 'रामलीला' या चित्रपटातील किसिंग सीनवर त्यांनं भाष्य केले आहे. रणवीरनं यावेळी त्याचा खुलासा केला आहे. 

Updated: Oct 26, 2023, 04:34 PM IST
 'आम्ही इतके हरवलो होतो की खालून दगड...', रामलीलामधील किसिंग सीनवर पहिल्यांदाच बोलला रणवीर title=
ranveer singh open up about his kissing scene with wife deepika in ramleela

Coffee With Karan Deepika Padukone and Ranveer Singh: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे दीपिका आणि रणवीर सिंगची. सध्या त्यांनी 'कॉफी विथ करण'च्या सिझन 8 ची. यावेळी या सिझनच्या पहिल्या एपिसोडला अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणवीर सिंगने हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या नात्यावर खुलासाही केला आहे. त्यांनी अनेक गोष्टींवर यंदा खुलासा केला. एकत्र पहिला चित्रपट मग त्यांचे अफेअर, लग्न आणि लग्नांनंतरची आता पाच वर्षे यांवर त्यांनी खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी 'रामलीला' या चित्रपटातील किसिंग सीन्सवरही भाष्य केले आहे. त्यांच्या या किसिंग सीन्सची बरीच चर्चा रंगलेली होती. यावेळी 'कॉफी विथ करण'च्या पहिल्या एपिसोडमध्ये याचा खुलासा केला आहे. नक्की ते यावेळी काय म्हणाले आहेत हे पाहुया. 

2012 साली रामलीला या चित्रपटाचे शुटिंग सुरू झाले होते. तेव्हा रणवीर हा दीपिकाच्या प्रेमात पडला होता. यावेळी रणवीरनं खुलासा केला की, संजय लीला भन्साळी यांचा सेट हा फार मोठा असतो. तेव्हा मी तिला पांढऱ्या चिकनकारी कुर्ता घालून दरवाज्यातून बाहेर येते तेव्हा मी तिला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडतो. तेव्हा दोघंही वाचन करायला सुरूवात करतात. सोबत जेवणही करतात. शुटिंगच्या दुसऱ्या दिवशीच त्यांच्यातील मैत्री वाढू लागते, असा खुलासा रणवीर सिंगनं केला आहे. 

यावेळी त्यांचे या चित्रपटात अनेक किसिंग सीन्स आहेत. एका किसिंग सीनमध्ये तर त्यांचा ताबा सुटला आणि त्यांना सावधान करण्यासाठी त्यांच्या पायावर दगड फेकला जातो. यावेळी रणवीरन याची आठवण सांगितली आणि त्याला कळलंच नाही असंही तो म्हणाला. त्यावेळी त्या दोघांची केमेस्ट्रीही सर्वांना कळू लागली होती. तेव्हा दीपिका ही रणवीर सिंगच्या मांडीवरही बसायची. सोबतच संजय लीला भन्साळीही त्यांना चिडवायचे. 2015 मध्ये त्यांनी एकमेकांना प्रपोज केले होते. त्यानंतर लेक कोमोमध्ये त्या दोघांनी 2018 साली लग्न केले. 

सध्या त्यांच्या या एपिसोडची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला आहे. एकमेकांचे फोटो ते दोघं फारसे इन्स्टाग्रामवर शेअर करत नव्हते. त्यामुळे चर्चा तर थेट त्यांच्या घटस्फोटांपर्यंतही गेल्या होत्या. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा होती. सध्या त्यांनी आपल्या नात्यावर उघडपणे खुलासा केला आहे. त्यामुळे यावेळी अनेकांच्या शंकाही दूर झालेल्या असतील. दीपिका 'फाईटर' या चित्रपटातून एकत्र दिसणार आहे. यावेळी त्या दोघांचे प्रेम पाहून चाहते भारावून गेले आहेत.