प्रिती झिंटाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्रीच्या आयुष्यातील 'तो' क्षण आलाच

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटाला आजही लोकं तिच्या डिंपलसाठी ओळखतात. तिच्या गोड स्माईलमागे अनेकजण तिचे चाहते आहेत. आता तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे

Updated: Oct 26, 2023, 04:23 PM IST
प्रिती झिंटाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्रीच्या आयुष्यातील 'तो' क्षण आलाच title=

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटाला आजही लोकं तिच्या डिंपलसाठी ओळखतात. तिच्या गोड स्माईलमागे अनेकजण तिचे चाहते आहेत. आता तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्याच्या आधारे अशी अटकळ बांधली जात आहे की, डिंपल गर्ल प्रीती झिंटा मुंबईत येऊन राहणार आहे. मात्र याबाबत अभिनेत्रीने काहीही सांगितलेलं नाहीये.

सध्या अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. सोनाक्षी सिन्हा ते करण कुंद्रा, अश्नूर कौर आणि मनीषा राणी यांनी अलीकडेच मुंबई शहरात नवीन घर खरेदी केली आहेत. आता या यादीत अभिनेत्री प्रीती झिंटाच्या नावाचाही समावेश झाला आहे. प्रिती झिंटानेही मुंबईत नवीन घर घेतलं आहे.

अभिनेत्री प्रिती झिंटा मोठ्या पडद्यापासून दूर गेली आणि परदेशात स्थायिक झाली असली तरी ती अजूनही चर्चेत आहे. आता अभिनेत्रीशी संबंधित नवीन बातम्या येत आहेत. असं म्हटलं जात आहे की, अभिनेत्रीने मुंबईतील पोर्शे एरिया, वांद्रे येथे एक नवीन मालमत्ता खरेदी केली आहे. जे 1474 स्क्वेअर फूटमध्ये पसरली आहे आणि त्याची किंमत 8.2 कोटी रुपये इतकी आहे. अभिनेत्रीचं नवीन घर नर्गिस दत्त रोडवर असलेल्या इमारतीच्या 11व्या मजल्यावर आहे, जिथे ती लग्न लग्नानंतर आणि कॅलिफोर्नियाला जाण्याआधी राहत होती.

लग्नानंतर अभिनेत्री अमेरिकेला झाली शिफ्ट 
प्रिती झिंटाने 2016 मध्ये बिझनेसमन जीन गुडइनफशी लग्न केलं. लग्नानंतर अभिनेत्री अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये शिफ्ट झाली आहे. 2021 मध्ये प्रीती आणि गुडनफ यांनी सरोगसीद्वारे त्यांच्या जुळ्या मुलांचं जय आणि जियाला जन्म दिला.  .

मात्र, ती अनेकदा भारतात येत असते. फिल्मी करिअरबद्दल बोलायचं झालं तर, प्रितीने 1998 मध्ये दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'दिल से' चित्रपटातून पदार्पण केलं. या अभिनेत्रीने पडद्यावर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यानंतर प्रिती झिंटा 2018 मध्ये 'भैयाजी-सुपरहिट' या एक्शन-कॉमेडी जॉनर चित्रपटातही दिसली होती.

प्रिती झिंटाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर तिची एकूण संपत्ती 15 मिलीयन डॉलर्स म्हणजेच 110 कोटी रुपये इतकी आहे. प्रिती झिंटा सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी आयपीएलच्या हंगामात ही अभिनेत्री चर्चेत असते. प्रीती आयपीएल संघ किंग्स 11 पंजाबची सह-मालक आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x