'छपाक' च्या फर्स्ट लूकची रणवीरवर छाप

रणवीरने ही पत्नी दीपिकाचे ट्विटरच्या माध्यमातून भरभरून कौतूक केले आहे.

Updated: Mar 26, 2019, 10:55 AM IST
'छपाक' च्या फर्स्ट लूकची रणवीरवर छाप  title=

मुंबई : 'पद्मावत' चित्रपटानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोन 'छपाक' चित्रपटाच्या माध्यमतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यास सज्ज झाली आहे. नुकताच निर्मात्यांनी चित्रपटातील दीपिकाच्या लूकवरून पडदा उठवला आहे. दीपिकाच्या या अव्हानात्मक लूकची सर्वच स्थरातून प्रशंसा होत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांसह सेलेब्रिटीही तिच्या लूकचे कौतुक करत आहेत. अशात तिचा 'सिम्बा' फेम पती अभिनेता रणवीर सिंग कासा काय मागे राहू शकतो... रणवीरने ही पत्नी दीपिकाचे ट्विटरच्या माध्यमातून भरभरून कौतूक केले आहे. तो म्हणाला, 'चित्रपटातील तुझा लूक थक्क करणारा आहे. मला तुझ्यावर गर्व आहे. आय लव्ह यू बेबी' असे प्रेरणादायी कमेंट त्याने दीपिकाच्या लूकवर केले आहे.

width: 500px; height: 419px;

सोमवारी दीपिकाच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला. ऑसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालच्या काही कठीण प्रसंगावर बेतलेला हा चित्रपट आहे. ऑसिड हल्ला होवूनही आयुष्य स्वछंदीपणे जगणाऱ्या कर्तुत्ववान स्त्रीच्या आयुष्यावर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.‘छपाक’मध्ये दीपिका साकारत असणाऱ्या पात्राचे नाव ‘मालती’ आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहेत. फॉक्स स्टार स्टुडिओज आणि दीपिका पादुकोनच्या केए एंटरटेनमेंटखाली चित्रपटाची निर्मिती होणार आहे. 10 जानेवरी 2020ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे अभिनेता अजय देवगणचा 'तानाजी : द अनसंग वॉरियर' सुध्दा 10 जानेवारी 2020 ला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.