Depression च्या थेरेपीविषयी रणबीर स्पष्टच म्हणाला...; कधीकाळी तोसुद्धा होता नैराश्यग्रस्त

Ranbir Kapoor on Depression : रणबीर कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं देखील थेरेपी घेतल्याचं सांगतं Depression विषयी केला खुलासा...

दिक्षा पाटील | Updated: Aug 5, 2024, 10:53 AM IST
Depression च्या थेरेपीविषयी रणबीर स्पष्टच म्हणाला...; कधीकाळी तोसुद्धा होता नैराश्यग्रस्त title=
(Photo Credit : Social Media)

Ranbir Kapoor on Depression : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचं त्याचे वडील ऋषी कपूर यांच्यासोबत ऑन आणि ऑफ असं नातं होतं. पण त्यानं नेहमीच मोकळेपणानं वक्तव्य केलं आहे. रणबीरनं एका मुलाखतीत सांगितलं की जेव्हा त्याचे वडील ऋषी कपूर यांच्यावर उपचार सुरु देखील झाले नव्हते तेव्हा ते मेंटल हेल्थच्या खूप वाईट परिस्थितीतून जात होते. ते त्यासाठी थेरपी देखील घ्यायचे. रणबीरनं सांगितलं की मेंटल हेल्थविषयी मी जास्त बोलू शकत नाही. 

रणबीरनं निखिल कामतला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्याचे वडील ऋषी कपूर यांच्या आधी तोच थेरेपी घेण्यासाठी गेला होता. याविषयी सविस्तर सांगत रणबीर म्हणाला, 'माझे वडील आजारी होण्याआधी मी थेरेपी ट्राय केली होती. ती थेरपी माझ्यावर काही दोन कारणांमुळे यशस्वी ठरली नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी स्वत: ला डॉक्टरांसमोर चांगल्या पद्धतीनं मांडू शकलो नाही. दुसरं कारण डॉक्टर कसं तरी मला समजवत होते की कोणत्या पद्धतीनं आयुष्याला कंट्रोल करु शकतो.' 

पुढे रणबीर म्हणाला, 'आयुष्यावर नियंत्रण आणण्यासाठी एक पद्धत आहे ज्यात तुम्ही स्वत: ला काही शिकवू  शकतात. तो जे काही मला सांगतोय, त्यानं मला एका गोष्टीची जाणीव झाली की मी मला आयुष्यात काही अदला-बदली करण्याची गरज नाही. मला कोणतीही भावना बाजूला ठेवून तिचा अनुभव हा टाळायचा नाही, कारण ती मला शांती देते. खरंतर या सगळ्यावर तुम्ही मोकळेपणानं बोलू शकत नाही. कारण कोणतीही व्यक्ती यातून कोणताही विषय निवडू शकतो आणि तुम्हाला अॅन्टी-फेमिनिस्ट किंवा मेल शॉविनिस्ट बोलू शकतात. मला वाटतं की पुरुष असो किंवा स्त्री, जर ते मानसिकरित्या स्थिर नाही. तर त्यांनी मदत घ्यायला हवी, त्याच कोणतीही लाजिरवानी गोष्ट नाही. त्या सगळ्या गोष्टींना घेऊन रडण्यास काही लाज नाही आणि जे लोक तुमच्यावर प्रेम करतात ते या गोष्टी समजून घेतील.'

रणबीरनं पुढे सांगितलं की 'मेंटल हेल्थ संबंधीत काही समस्या असतील तर त्याला शांतीनं आणि ग्रेसफुली हाताळा. याविषयी सविस्तर सांगत तो म्हणाला की अनेक लोक त्याचा खरंच फायदा घेतात. मानसिक आरोग्य एक अशी समस्या आहे जिला शांतीपूर्वक आणि खूप प्रेमानं हाताळायचं असतं. कोणत्याही कामाला न करतं किंवा हे नाही ते नाही अशी कारणं न देणं. ही एक समस्या आहे, त्याचं उत्तर शोधा आणि त्यावर काम करा.'

हेही वाचा : ...अन् हॉलिवूड स्टार पत्नीसमोरच ऐश्वर्या रायशी फ्लर्ट करू लागला; समोर आला 13 वर्षांपूर्वीचा 'तो' VIDEO

दरम्यान, रणबीरच्या कामाविषयी बोलायचं झालं तर नितेश तिवारीच्या 'रामायण'मध्ये तो दिसणार आहे. तो सध्या त्याची शूटिंग करत आहे. त्याशिवाय त्याच्याकडे संदीप रेड्डी वांगाचा अ‍ॅनिमल पार्क आणि संजय लीला भन्साळीचा 'लव्ह अ‍ॅन्ड वॉर' हा चित्रपट देखील आहे.