'अ‍ॅनिमल'सारखा लूक हवाय? रणबीरचा 11 किलो वजन वाढवतानाचा व्हिडीओ आला समोर

Ranbir Kapoor:  अ‍ॅनिमल सिनेमात रणबीरने लांब केस आणि दाढीसह आपला दमदार लूक दाखवला आहे.चित्रपटात रणबीरने आपल्या अभिनयानेच नव्हे तर साऊथ हिरोंप्रमाणे राखलेल्या पर्सनालिटीने चाहत्यांना थक्क केले आहे. दरम्यान रणबीरने बॉडी ट्रान्सफॉर्मेशन कसे प्रत्यक्षात आणले याचा एक व्हिडीओ समोर आलाय. रणबीरचे चाहते हा व्हिडीओ खूप शेअर करत आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 5, 2023, 09:27 AM IST
'अ‍ॅनिमल'सारखा लूक हवाय?  रणबीरचा 11 किलो वजन वाढवतानाचा व्हिडीओ आला समोर title=

Ranbir Kapoor: अ‍ॅनिमल सिनेमा रिलीज झाल्यानंतर अभिनेता रणबीर कपूरच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रणबीर कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड्स मागे टाकले आहेत. ‘अ‍ॅनिमल’ हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट म्हणून उदयास येत आहे. दरम्यान रणबीर कपूरचा अभिनय आणि त्याने बॉडीवर घेतलेल्या मेहनतीची सर्वत्र चर्चा आहे. अ‍ॅनिमल सिनेमा यशस्वी होण्याचे श्रेय रणबीर कपूरच्या अभिनय आणि त्याच्या लुक्सला जाते. या चित्रपटात रणबीरने लांब केस आणि दाढीसह आपला दमदार लूक दाखवला आहे.चित्रपटात रणबीरने आपल्या अभिनयानेच नव्हे तर साऊथ हिरोंप्रमाणे राखलेल्या पर्सनालिटीने चाहत्यांना थक्क केले आहे. दरम्यान रणबीरने बॉडी ट्रान्सफॉर्मेशन कसे प्रत्यक्षात आणले याचा एक व्हिडीओ समोर आलाय. रणबीरचे चाहते हा व्हिडीओ खूप शेअर करत आहेत. 

रणबीरच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची झलक

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by SHIVOHAAM (@shivohamofficial)

'तू झुठी मैं मक्कारर' या चित्रपटात रणबीर कपूर अतिशय दुबळ्या शरीरात दिसला होता. तर 'अ‍ॅनिमल'मध्ये तो खूपच भारदस्त दिसत होता. काही दिवसांतच रणबीरचे हे अप्रतिम बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. पणरणबीर कपूरने अॅनिमल सिनेमासाठी त्याची अप्रतिम बॉडी कशी तयार केली याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? रणबीरच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनची झलक व्हिडीओच्या माध्यमातून पाहुया. 

'अ‍ॅनिमल'साठी रणबीरने वाढवले ​​11 किलो वजन

अलीकडेच अभिनेता रणबीर कपूरचे फिटनेस कोच शिवोहमने त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याने हे पात्र साकारण्यासाठी रणबीरने कसा घाम गाळला हे दिसत आहे. यासोबतच शिवोहमने रणबीर कपूरच्या शेड्युलबद्दलही लिहिले आहे. शिवोहमने सर्वात आधी रणबीर कपूरच्या दोन फोटोंचा कोलाज शेअर केला होता, ज्यामध्ये रणबीरचा 'तू झुठी मैं मक्कर'मधील फर्स्ट लूक दिसत आहे. ज्यादरम्यान त्याचे वजन 71 किलो होते. दुसरा फोटो रणबीरच्या अॅनिमल लूकचा आहे. ज्यामध्ये त्याचे वजन 11 किलो वाढून 82 किलो झाले आहे. 

'हे सर्व 2021 मध्ये सुरू झाले जेव्हा आम्ही लव रंजनच्या 'तू झुठी में मक्कर'साठी बीच बॉडी लूकची तयारी सुरू केली आणि त्यानंतर 2022 मध्ये जेव्हा आम्ही संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची तयारी सुरू केली, असे कॅप्शन त्यांनी फोटोवर लिहिले आहे. अ‍ॅनिमलच्या सेटवरून रणबीरचा वर्कआउट व्हिडीओ समोर आला आहे. याशिवाय शिवोहमने तिच्या इन्स्टावर एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये रणबीर बॉडीवर खूप मेहनत करताना दिसत आहे. 'शांतपणे काम करा, जेणेकरून तुमच्या यशाचा आवाज येईल.' असे कॅप्शन यावर लिहिण्यात आले आहे.आणि खरंच रणबीरच्या या मेहनतीने सगळीकडे धमाल उडाली आहे.

चित्रपटाची स्टार कास्ट

रणबीर कपूर व्यतिरिक्त अ‍ॅनिमल चित्रपटात रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल, शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय, प्रेम चोप्रा आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे. संदीप वांगा हे 'कबीर सिंग' आणि 'अर्जुन रेड्डी' दिग्दर्शित करण्यासाठी ओळखला जातात. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीज, मुराद खेतानी यांच्या सिने1 स्टुडिओ आणि प्रणॉय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्सद्वारे सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.