पुष्पा हिट ठरण्यामागे अल्लु अर्जुनच नव्हेतर 'या' व्यक्तीचा मोठा हात, सेटवरील व्हिडीओ समोर

दोन्ही गाण्यांमधील फनी स्टेप्स सर्वांच्याच पसंतीस उतरल्या आहेत आणि लोक त्यांची कॉपी करत आहेत आणि त्यांच्यावर खूप रील बनवत आहेत.

Updated: Feb 1, 2022, 05:32 PM IST
पुष्पा हिट ठरण्यामागे अल्लु अर्जुनच नव्हेतर 'या' व्यक्तीचा मोठा हात, सेटवरील व्हिडीओ समोर title=

मुंबई : अल्लू अर्जुन सध्या त्याच्या पुष्पा चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाच्या कथे सोबतच लोकांना, यातील स्टाईल, गाणं आणि डान्सने वेड लावलं आहे. जो तो या चित्रपटातील गाण्यावरती डान्स करत आहेत. यामधील डान्स देखील लोकं सोशल मीडियावर कॉपी करत आहेत. यातील गाण्यांनी लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. रश्मिका मंदान्ना आणि अल्लू अर्जुन यांचे श्रीवल्ली गाणे असो किंवा समंथा प्रभूचे ओ अंतवा गाणे असो, दोन्ही गाणी लोकांना खूप आवडली आहेत आणि ही गाणी प्रेक्षकांना खूप आवडत आहेत.

केवळ गाणीच नाही तर या गाण्यांवरील डान्स ही लोकांना खूप आवडला आहे. या दोन्ही गाण्यांमधील फनी डान्स स्टेप्स सर्वांच्याच पसंतीस उतरल्या आहेत आणि लोक त्यांची कॉपी करत आहेत आणि त्यांच्यावर खूप रील बनवत आहेत.

परंतु तुम्हाला माहित आहे का की, हे हिट होण्यामागे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध व्यक्तीचा हात आहे. ज्याने सेटवरती सगळ्यांना आपल्या तालावर नाचवलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुष्पा चित्रपटातील ओ अंतवा या गाण्यातील समंथा प्रभूचा डान्स सगळ्यांना भुरळ घालत आहे. या गाण्यात सामंथा अगदी वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. तिची ही स्टाइल सगळ्यांनाच आवडली आहे आणि याचे श्रेय जाते गणेश आचार्य यांना. त्यांनीच या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन म्हणजेच कॉरिओग्राफर केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गणेश आचार्यहे बॉलीवूडचे प्रसिद्ध डान्स मास्टर आहेत. श्रीवल्ली गाण्याची प्रसिद्ध हुक स्टेप देखील त्यांनीच क्रिएट केली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रसिद्ध होण्यामागचे गणेश आचार्य यांचा मोठा हात आहे