Pushpa मधील लोकप्रिय डायलॉग म्हणत डेव्हिड वॉर्नरने जिंकलं मन, व्हिडीओ व्हायरल

डेव्हिड वॉर्नने पुष्पा चित्रपटाचा रील बनवला आणि अभिनेता अल्लू अर्जुनचा प्रसिद्ध संवाद बोलण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated: Jan 3, 2022, 08:03 PM IST
Pushpa मधील लोकप्रिय डायलॉग म्हणत डेव्हिड वॉर्नरने जिंकलं मन, व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात प्रत्यके सेलिब्रिटी हा नेहमीच ऍक्टिव असतो. येथून त्यांना आपल्या चाहत्यांशी संवाद साधता येतो. तसेच ते वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करुन आपल्या चाहत्यांना माहिती देत असतात आणि त्यांचे मनोरंजन देखील करतात. ऑस्ट्रेलियन स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा देखील सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव असतो. तो वेगवेगळ्या तेलुगु आणि हिंदी गाण्यांवर आणि त्यांच्या दृश्यांवर रील आणि टिकटोक व्हिडीओ बनवतो आणि ते आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असतो.

यावेळी डेव्हिड वॉर्नने पुष्पा चित्रपटाचा रील बनवला आणि अभिनेता अल्लू अर्जुनचा प्रसिद्ध संवाद बोलण्याचा प्रयत्न केला आहे.

वॉर्नरने गुरुवारी त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका छोट्या सहा सेकंदाच्या व्हिडीओमध्ये अल्लु अर्जुनच्या प्रसिद्ध डायलॉगवरती लिप-सिंक केला आणि अल्लू अर्जुनची ट्रेडमार्क स्टाईल देखील कॉपी केली.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच वाऱ्यासारखा पसरला आहे. या व्हिडीओने केवळ चाहत्यांचे आणि डेव्हिडच्या फॉलोअर्सचेच लक्ष वेधून घेतले नाही तर पुष्पाच्या अधिकृत ट्विटर हँडलने देखील त्याला शेअर केले आहे.

डेव्हिडचा मित्र आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने गमतीने विचारले, 'तू ठीक आहेस ना?' याशिवाय वॉर्नरचे आयपीएलचे सहकारी श्रीवत्स गोस्वामी, वृद्धिमान साहा आणि खलील अहमद यांनीही कमेंट केली आहे. एवढेच नाही तर पुष्पा चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुननेही त्याच्या अभिनयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वॉर्नरच्या काही चाहत्यांनी त्याला भारतीय नागरिकत्व देण्याची वकिलीही केली आहे.

'पुष्‍पा: द राइज' हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. अल्लू अर्जुन स्टार या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच आठवड्यात 200 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपटाचा पहिला भाग आहे. तर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची निर्मिती पुढील वर्षी 2022 मध्ये सुरू होणार आहे.