इंटरनेट सेंसेशन प्रिया प्रकाशच्या ट्रेलरने केली छप्पर फाड कमाई

देशभरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेली प्रिया प्रकाश वारियरने केवळ एक डोळा मारून करोडोंची कमाई केली आहे. 

Updated: Feb 15, 2018, 08:54 PM IST
इंटरनेट सेंसेशन प्रिया प्रकाशच्या ट्रेलरने केली छप्पर फाड कमाई title=

मुंबई : देशभरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेली प्रिया प्रकाश वारियरने केवळ एक डोळा मारून करोडोंची कमाई केली आहे. 

किती लोकांनी पाहिलाय व्हिडिओ?

ज्या व्हिडिओतील ही क्लिप व्हायरल झाली होती तो ट्रेलरही मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे. यूट्यूबवर याचे व्ह्यूज खूप वाढले आहेत. मल्याळम सिनेमा ‘ओरू अदार लव्ह’चा ट्रेलर ५ दिवसांपूर्वी अपलोड केला गेला होता. आणि आत्तापर्यंत हा ट्रेलर १.५ कोटींपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. यूट्य़ूबवर अपलोड झालेल्या व्हिडिओतून कमाईची आकडेवारी एका वेबसाईटने जारी केली आहे. 

किती झाली कमाई?

सोशल ब्लेड ही ती वेबसाईट आहे. त्यांच्यानुसार हा व्हिडिओ अपलोड करणा-या यूट्यूब चॅनलने ७६०० डॉलर ते ६०८०० डॉलरची कमाई केली आहे. भारतीय मुद्रेत ही रक्कम ५ लाख ते ३९ लाख रूपये इतकी आहे. या चॅनलने प्रिया प्रकाशच्या सिनेमातील आणखी एक टीझर अपलोड केलाय. सोशल ब्लेडच्या आकडेवारीनुसार टीझरमुळे १७००-१३७०० डॉलर म्हणजेच १.१० लाख रूपये ते ८.८ लाख रूपयांपर्यंत कमाई केली गेली आहे.