आपल्या ड्रेसमुळे ट्रोल झाली गायिका, म्हणाली, ‘बहिण शब्दाचा वापर नका करू’

सोशल मीडियात कोण, कधी आणि कुठे ट्रोल होईल हे सांगता येत नाही. बॉलिवूड अभिनेते तर नेहमीच सोशल मीडियात ट्रोल होत असतात.

Updated: Feb 15, 2018, 08:30 PM IST
आपल्या ड्रेसमुळे ट्रोल झाली गायिका, म्हणाली, ‘बहिण शब्दाचा वापर नका करू’ title=

मुंबई : सोशल मीडियात कोण, कधी आणि कुठे ट्रोल होईल हे सांगता येत नाही. बॉलिवूड अभिनेते तर नेहमीच सोशल मीडियात ट्रोल होत असतात. आता या यादीत प्रसिद्ध गायिका नेहा भसीन सुद्धा आली आहे. लोकांनी नेहाला तिच्या ड्रेसमुळे ट्रोल केलंय. पण यावेळी नेहा ट्रोलर्सना महागात पडत असल्याचे दिसत आहे. 

इन्स्टाग्रामवरील फोटो वादात

नेहा बसीनने नुकतेच काही तिचे काही फोटो आणि एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. हे फोटो आणि व्हिडिओ नेहा बसीनच्या एका स्टेज शोमधील आहेत. ज्यात ती डान्सर्ससोबत परफॉर्म करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये नेहाने ब्लॅक ट्रान्सपरंट टॉप परीधान केला आहे. ज्यात ती अधिक बोल्ड आणि बिनधास्त दिसत आहे. हेच लोकांना पसंत पडलं नही आणि लोकांनी तिला ट्रोल करणं सुरू केलं. 

 

Lead your army to breaking all barriers that point to judgement and hatred. Love is the only answer. #nehabhasinlive #nehabhasin #onlylove

A post shared by Neha Bhasin (@nehabhasin4u) on

कुणी नेहाला ‘जाड’ म्हटलं तर कुणी ‘एका गायिकेने असे कपडे घालणे योग्य नाहीये’ असे म्हटले. 

 

When #launggawacha is  on stage. #nehabhasinlive #nehabhasin

A post shared by Neha Bhasin (@nehabhasin4u) on

 
अशात एक यूजर म्हणाला की, ‘हे काय घातलंय, हे बरोबर नाहीये सिस्टर’. यावर नेहाने यूजरला उत्तर दिले. 

neha basin

नेहाने दिलं सडेतोड उत्तर

नेहाने त्या यूजरला सडेतोड उत्तर देत लिहिले की, ‘सिस्टर? माझी बहिण सोशल मीडियात न कुणाचा पाठलाग करत ना उगाच कुणाला सल्ला देत. त्यामुळे कृपया बहिण या शब्दाचा वापर करू नका’. 

नेहाने नुकत्याच आलेल्या सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ सिनेमातील ‘स्वॅग से स्वागत’ गाण्याला आपला आवाज दिलाय.