Prajakta Mali Birthday: ना मेकअप, ना बोल्ड स्टाईल; वाढदिवसानिमित्त प्राजूनं नाहीच केला कसला थाट! पाहा Photos

Prajakta Mali Birthday: आज महाराष्ट्राच्या क्रशचा म्हणजेच प्राजक्ता माळीचा वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरू झाली आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की प्राजक्तानं आपल्या वाढदिवसानिमित्त एक खास गोष्ट केली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 8, 2023, 11:21 AM IST
Prajakta Mali Birthday: ना मेकअप, ना बोल्ड स्टाईल; वाढदिवसानिमित्त प्राजूनं नाहीच केला कसला थाट! पाहा Photos title=
August 8, 2023 | Prajakta Mali celebrates birthday shares her family holiday photos on instagram at her farmhouse at karjat

Prajakta Mali Karjat Farm House Photos: अभिनेत्री प्राजक्ता माळीची सोशल मीडियावर तुफान चर्चा असते. इन्टाग्रामवरही तिचे असंख्य फॉलोवर्स आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा एकदा सुरू होते आहे. तेव्हा चाहत्यांना त्यांच्या लाडक्या प्राजक्ता माळीला पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे इंटरनेटवर त्याचीही चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. आज तुमच्या लाडक्या प्राजूचा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या प्राजक्ता माळीनं इन्टाग्रामवर आपल्या नव्या कर्जतमधील फार्म हाऊसचे काही फोटो शेअर केलेले आहेत. यावेळी तिनं आपल्या संपुर्ण कुटुंबियांसमवेत या कर्जतच्या फार्महाऊसवर आपला निवांत वेळ घालवला होता. येथे केलेल्या मौजमजेचे टिपलेले क्षण तिनं सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेले आहेत. सध्या जूलै - ऑगस्टचा सिझन सुरू आहे. त्यामुळे सर्वचजण मस्त आऊटिंगच्या मूडमध्ये आहेत. त्यामुळे प्राजक्तानंही याची संधी सोडलेली नाहीये. 

प्राजक्ता माळी गेली अनेक वर्षे मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते आहे. 2014 साली आलेल्या 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेनंतर तिच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली होती. त्यानंतर तिनं अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांतूनही कामं केली आहेत. अलीकडेच तिनं 'रानबाजार' या वेबसिरिजमध्येही अभिनय केला होता. तिच्या या अभिनयाचेही प्रचंड कौतुक झाले होते. त्यासोबत या  वेबसिरिजमधील तिच्या बोल्ड आणि हटके लुकमुळे तिचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. तिला काहीवेळा ट्रोलही केले जाते. परंतु प्राजक्ताचा महाराष्ट्रात फार मोठा चाहतावर्ग आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे ती मराठी रसिक प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त प्राजक्तानं आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवला आहे. तिचे फोटो पाहून तुम्हीही तिचे कौतुक कराल, हे नक्की. 

हेही वाचा - AI नंही हेरलं महेश मांजरेकरांचं डॅशिंग व्यक्तिमत्त्व; पाहा फोटो

वर म्हटल्याप्रमाणे प्राजक्ता माळीनं आपल्या कुटुंबियांसमवेत कर्जतमध्ये वेळ घालवला आहे. यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''निसर्ग तुम्हाला शांती देतो परंतु कुटुंबियांसोबत निसर्गाचा आस्वाद घेणं म्हणजे तुमच्यासाठी एक साधनाच आहे.'' #झरे #छोटेधबधबे #घराजवळ #thegreenmontana #karjat #monsoon #nature #love #green #water #forestbath असं हॅशटॅग्स तिनं इन्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यावेळी तिनं कुटुंबियांसोबत धबधब्यामध्ये वेळ घालवला आहे. सोबतच आपल्या फार्महाऊसवर तिनं कुटुंबियांसोबतचे काही फोटोही पोस्ट केले आहेत. 

पाहा फोटो - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'प्राजक्ताराज' हा तिचा ज्वेलरी ब्रॅण्ड आहे. त्यानंतर आता तिनं कर्जत येथेही फार्महाऊस विकत घेतलेले आहे. सध्या तिनं शेअर केलेल्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनीही कौतुकाचा वर्षाव केलेला आहे. आज प्राजक्ताचा वाढदिवस आहे तेव्हा यावेळी तुम्ही तिला काय गिफ्ट द्याल?