रवीना टंडनच्या मुलीचा बदलेला लूक पाहून चाहते हैराण

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानीचं वय जरी अजून जास्त झालं नसलं तरी फॅशनच्या बाबतीत ती आपल्या आईला टक्कर देते.

Updated: Jun 7, 2022, 08:52 PM IST
रवीना टंडनच्या मुलीचा बदलेला लूक पाहून चाहते हैराण title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानीचं वय जरी अजून जास्त झालं नसलं तरी फॅशनच्या बाबतीत ती आपल्या आईला टक्कर देते. जेव्हा-जेव्हा दोघं एकत्र स्पॉट होतात तेव्हा मीडियाच्या नजरा रवीना आणि तिच्या मुलीवर पडतात. राशा थडानी दिसायला खूप सुंदर आहे.

सोशल मीडियावर तुम्ही आतापर्यंत राशाचे अनेक सुंदर फोटो पाहिले असतील. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा तिचा एक नवीन व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये राशा तिची आई रवीना टंडनसोबत दिसत आहे. मात्र नेहमीप्रमाणे राशाने चांगलीच प्रसिद्धी मिळवली.

रवीना टंडनची मुलगी राशा थडानीचा हा व्हिडिओ फिल्मी ग्यान नावाच्या इन्स्टा हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आई आणि मुलगी दोघीही स्टायलिश दिसत आहेत. दोघंही स्पॉट होताच. फोटोग्राफर्सना पाहून राशा आधी पुढे जाते, पण नंतर आईच्या हाकेवर परत येते आणि पोझ देते. आई आणि मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राशा तिच्या आईसारखी मोठी आणि सुंदर झाली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बहुतेक लोकं राशाची तुलना तिची आई रवीना टंडनशी करत आहेत. राशा हुबेहुब तिच्या आईसारखी दिसत असल्याचं ते सांगत आहेत. व्हिडिओवर कमेंट करत एका सोशल मीडिया यूजरने लिहिलं की, 'रवीनाची हुबेहूब कॉपी'. त्याचबरोबर आणखी एका यूजरने लिहिलं की, 'बॉलिवुडमध्ये अजून मोठा धमाका व्हायचा आहे'. एकूणच राशा आणि रवीनाच्या या लेटेस्ट व्हिडिओवर लोकं प्रेमाचा वर्षाव करत आहेत.