कधी रस्त्यावर काढावी लागली रात्र; 'या' मुलाच्या संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का

या मुलावर आली होती कधी बिकट परिस्थिती, आज आहे इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक... तर अभिनयानं जिंकली लाखो प्रेक्षकांची मनं 

दिक्षा पाटील | Updated: Feb 11, 2024, 02:59 PM IST
कधी रस्त्यावर काढावी लागली रात्र; 'या' मुलाच्या संपत्तीचा आकडा ऐकून बसेल धक्का title=
(Photo Credit : Social Media)

Guess the Actor : 80 च्या दशकात असे अनेक कलाकार झाले ज्यांची आज खूप कमी लोकांना आठवण आहे तर काही कलाकार आहेत जे लोकप्रियतेच्या त्या शिखरावर पोहोचले याचा विचारही कोणी करू शकत नाही. सध्या त्यांच्यातील एका कलाकाराचा लहानपणीचा फोटो व्हायरल होतोय. या कलाकारानं जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याला जास्त यश मिळालं नाही. त्यानंतर त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप होत गेले. मात्र, त्यानंतर एकाच चित्रपटातून या कलाकाराला यश मिळालं आणि आज त्यांना कोणीही मागे टाकू शकत नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहेत हा सेलिब्रिटी...

जर तुम्ही या कलाकाराला ओळखू शकल नाही. तर एक हिंट आहे आणि ती म्हणजे त्यांनी 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज त्यांची 3500 कोटींची संपत्ती आहे, असे म्हटले जाते. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते त्यांना शहंशाह या नावानं ओळखतात. त्यांचं नाव अमिताभ बच्चन आहे.

अमिताभ बच्चन यांचा त्यांच्या आईसोबतचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ अजिताभ बच्चन देखील आहेत. अमिताभ यांचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. अमिताभ बच्चन यांनी त्याचं शिक्षण दिल्लीत पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी कोलकातामध्ये शिपिंग फर्ममध्ये नोकरी केली. त्यानंतर अमिताभ बच्चन हे मुंबईकडे वळाले आणि त्यांच्या भावानं त्यांना या निर्णयात पाठिंबा दिला होता. 

हेही वाचा : प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार रश्मिका मंदाना!

अमिताभ बच्चन यांना सुरुवातीला अनेक जाहिरातींच्या ऑफर मिळाल्या. मात्र, त्यांनी चित्रपटात काम करण्याचं ठरवलं होतं. त्यांना वाटलं की जर त्यांनी जाहिरातींमध्ये काम केलं तर त्यांचं चित्रपटांमध्ये काम करण्याचं जे स्वप्न होतं ते तिथेच राहून जाईल. त्यानंतर त्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये 50 रुपये प्रती महिना काम करणं सुरु केलं. पैशांच्या अडचणीमुळे जेव्हा बिग बी यांच्याकडे राहण्यासाठी ठिकाण नव्हतं तेव्हा ते मरीन ड्राइव्हवर एका बेंचवर रात्री झोपायचे. आज ते इंडस्ट्रीतील इतके मोठे कलाकार आहेत की शाहरुख आणि सलमान पासून अनेक कलाकार त्यांना वडिलांचा दर्जा देतात.