नोरा फतेहीचा मराठी तोरा, मराठमोळा लुक आला समोर

नोरा फतेही स्पॉट झाली मराठमोळ्या लुकमध्ये, फोटो आणि VIDEO पाहून चाहते थक्क 

Updated: Sep 27, 2022, 09:00 PM IST
नोरा फतेहीचा मराठी तोरा, मराठमोळा लुक आला समोर title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि बेली डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर व्ह़ि़डिओ (Social media) आणि फोटो पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाचा तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हि़डिओत ती मराठमोळ्या लुकमध्ये दिसत आहे.हा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

व्हिडिओत काय? 
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) दिसत आहेत. एका शुटींगच्या सेटवर ती चालताना दिसत आहे. या सेटवर तिच्या बाजूला तिचे बॉडिगार्ड असून ती चालत आहे. या व्हिडिओत पाहील तर नोराने मराठी लुक कॅरी केला आहे, तिच्या या मराठमोळ्या तोऱ्याची एकच चर्चा आहे. 

लुकची चर्चा 
नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) मराठमोळ्या लुकची खुप चर्चा आहे. नोराने हिरव्या कलरची सुंदर साडी परीधान केली आहे. आणि चमकीदार हिरव्या कलरचा ब्लाऊज घातला आहे. तर तिचा हा लुक पुर्ण करण्यासाठी मराठी स्टाइलमध्ये नाकात नथ आणि गळ्यात ज्वेलरी घातली आहे. ही नथ तिच्या चेहऱ्यावर खुलुन दिसत आहेत.तसेच तिने पायात हिरव्या कलरची सॅडल घातली आहे. नोराचा हा लुक प्रेक्षकांना घायाळ करत आहेत. 

नोराचा (Nora Fatehi Video) हा व्हायरल व्हिडिओ प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. नोराच्या या मराठमोळ्या लूकवर चाहेत फिदा झाले असून व्हिडिओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडतायत. नोराच्या व्हिडिओवर चाहते लिहित आहेत, 'कोणी इतकी सुंदर कशी असू शकते.' दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'सिंपल आणि गोड.' तर तिथे काही यूजर्सने 'Gorgeous, lovely' असे लिहिले आहे.  

दरम्यान नोरा फतेही (Nora Fatehi Video) टीव्ही रिअॅलिटी शो झलक दिखला जा 10 (jhalak dikhala ja 10), च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या शुटींग दरम्यान तिने हा मराठमोळा लुक कॅरी केला होता. या तिच्या लुकची एकच चर्चा आहे.