नोराला पावसात साडी नेसणं पडलं महागात; व्हायरल व्हिडिओमुळे एकच चर्चा

मुंबईचा पाऊस केव्हा येईल, किती पडेल आणि कधी जाईल, याचा अंदाज कोणालाच बांधता येत नाही.

Updated: Jul 4, 2022, 09:08 PM IST
नोराला पावसात साडी नेसणं पडलं महागात; व्हायरल व्हिडिओमुळे एकच चर्चा title=

मुंबई : मुंबईचा पाऊस केव्हा येईल, किती पडेल आणि कधी जाईल, याचा अंदाज कोणालाच बांधता येत नाही. त्यामुळेच मुंबईकर दरवर्षी या पावसामुळे अस्वस्थ होतातच. असाच काहिसा प्रकार  यावेळी नोरा फतेहीसोबत घडला आहे. मुंबईच्या पाऊसावर अभिनेत्री नाराज झाली आहे. नोराने साडी नेसली आहे.  मुसळधार पावसाचा नोराला त्रास झाला आहे.

साडी नेसून नोरा अस्वस्थ 
नोरा फतेही सोमवारी डान्स दिवाने ज्युनियरच्या सेटवर दिसली होती. जिथे ती एका सुंदर साडीत दिसली. मात्र दुपारी मुसळधार पावसाने मुंबईतील वातावरण प्रसन्न केलं. पण या पावसात नोरा फतेही साडीत थोडी नाराज झाली. त्यामुळे सेटपासून व्हॅनिटी व्हॅनपर्यंत खास वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती आणि नोराला वाहनातून व्हॅनिटी व्हॅनपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. नोराच्या साडीचा पदर दुसऱ्या कोणीतरी पकडला. तेव्हा नोराने ती साडी गुडघ्यापर्यंत उचलली आणि व्हॅनिटी व्हॅनचा प्रवास पूर्ण केला.

नोराच्या या लूकची बरीच चर्चा आहे
जेव्हा-जेव्हा नोरा फतेही साडीत दिसली तेव्हा-तेव्हा तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसलं. यावेळीही असंच काहिसं चित्र पाहायला मिळालं आहे. नोरा फतेहीने गुलाबी रंगाच्या साडीत चांगलाच धुमाकूळ घातला असून, तिच्या डिझायनर साडी आणि लूकची खूप चर्चा होत आहे. नोराची ही स्टाईलही सगळ्यांना खूप आवडते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नोरा डान्स दिवाने ज्युनियर जज करत आहे
नोरा फतेहीने आता इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे. आजकाल, सर्वोत्कृष्ट डान्सर नोरा बॉलीवूडच्या दिग्गज नीतू कपूर आणि नृत्यदिग्दर्शकासह एवढ्या मोठ्या रिअॅलिटी शोला जज करत आहे आणि प्रसिद्धीच्या झोतात आहे.