नोराचा अजबच तोरा!बिचवर केला तुफान डान्स, पाहा VIDEO

नोरा फतेहीच्या बिचवरील डान्सची का होतेय चर्चा, VIDEO पाहून तुम्हीच सांगा 

Updated: Oct 14, 2022, 10:51 PM IST
नोराचा अजबच तोरा!बिचवर केला तुफान डान्स, पाहा VIDEO  title=

मुंबई :  बॉलिवूडची दिलबर गर्ल अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या उत्कृष्ट डान्ससाठी नेहमीच ओळखली जाते.डान्स करण्याची ती एकही संधी सोडत नाही. यामुळेच तिचे मोठ्या प्रमाणावर डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता असाच तिचा एक डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.या डान्सची सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे.

नोरा फतेही  (Nora Fatehi Dance) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता तिने आणखीण एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची खुप चर्चा सुरू आहे. 

नोरा फतेहीचा (Nora Fatehi) हा व्हिडिओ व्हेकेशनचा आहे, ज्यामध्ये नोरा फतेही समुद्र किनाऱ्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नोरा फतेही दोन मित्रांसोबत डान्स करत आहे. व्हिडिओमध्ये नोरा फतेहीच्या शानदार डान्ससोबतच तिचा ग्लॅमरस लूकही पाहायला मिळत आहे. 

व्हिडिओत नोरा फतेहीने  (Nora Fatehi Dance) लाल रंगाचा बिकिनी टॉप आणि शॉर्ट्स परीधान केली आहे. या आऊटफिटमध्ये ती खुपच सुंदर दिसत आहे. दरम्यान डान्सचा हा व्हिडिओ शेअर करताना तिने एक खास कॅप्शनही लिहिले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेक चाहते हा व्हिडिओ लाईक कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, 'नोरासारखा डान्स कोणीही करू शकत नाही.' दुसऱ्याने लिहिले की, 'अप्रतिम नृत्य.' तिसऱ्या युझरने लिहले की, 'नोरासारखे कोणी नाही.'  सोशल मीडियावर नोरा फतेहीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.