नेहा कक्कडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

नेहाने जगभरातल्या अनेक प्रसिद्ध गायिकांना मागे टाकण्यात यश मिळवले आहे.  

Updated: May 9, 2020, 06:05 PM IST
नेहा कक्कडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा title=

मुंबई : 'मिले तुम हमको', 'दिलबर', 'माही वे' अशा एका पेक्षा गाण्याच्या माध्यमातून गायक नेहा कक्कडने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. टॉप गायिकांच्या रांगेत असलेली नेहा कक्कर कायम चर्चेत असते. आता देखील तिच्याबद्दल जोरदार चर्चा रंगत आहेत. आता पुन्हा तीने स्वत:च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जगभरात यूट्यूबवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या गायिकाच्या यादीत नेहानं दुसऱ्या क्रमांकाचं स्थान पटकावलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Can’t be more thankful!!!! Jai Mata Di Aapki Nehu  #NehaKakkar . @youtube @youtubeindia

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

नेहा ही बातमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. एक पोस्ट करत तिने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. Ex acts chArt'द्वारे २०१९ मध्येजाहिर केली आहे. त्यात नेहा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

नेहाला ४.५ बिलियन लोकांनी युट्युबवर सर्च केलं आहे. जगभरातल्या मोठ्या आणि प्रसिद्ध गायिकांना नेहानं यात मागे टाकलं आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.