मुंबई : ‘सकर फॉप पेन’, ‘स्पीड मी अप’, ‘थिंक अबाउट अस’, ‘लव्ह यु बेटर’ अशा अनेक सुपरहिट गाण्यांच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आलेल्या रॅपर TY चा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तो ४७ वर्षांचा होता. TY हा एक ब्रिटिश रॅपर आहे. त्याचं खरं नाव बेन चिजिओके असं होतं. कोरोनाने सध्या संपूर्ण जगात थैमान घातले आहे. याआधी देखील अनेक कलाकारांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. कलाकारांच्या अशा जाण्यामुळे चाहता वर्गाला मोठा धक्का बसत आहे.
बीसीसीने दिलेल्या वृत्तानुसार रॅपर TY ला एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर लंडनच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो एकदा कोमात देखील गेला होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कोमातून बाहेर येताच गुरूवारी त्याने अखेरचा श्वास घेतला.
गेल्या १५ दिवसांमध्ये बिल कार्पेंटर, अॅलन मेरल, जॉन प्राइन, ऑस्कर चावेझ या चार प्रसिद्ध संगीतकारांचा मृत्यू झाला आहे. हॉलिवूडने कोरोनामुळे अनेक कलाकार गमावले आहे. ही हॉलिवूडकरांसाठी अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे सध्या जगभरात कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.