‘मिर्झापूर’च्या बिनानं पुन्हा घायाळ करणाऱ्या व्हिडीओतून दिला 'इशारा'...

पाहा तिनं यावेळी काय नवं केलं आहे.... 

Updated: Mar 24, 2022, 03:46 PM IST
‘मिर्झापूर’च्या बिनानं पुन्हा घायाळ करणाऱ्या व्हिडीओतून दिला 'इशारा'...  title=

मुंबई : ‘मिर्झापूर’ या सीरिजमध्ये बिना त्रिपाठी ही भूमिका साकारत अभिनेत्री रसिका दुग्गल कमालीची लोकप्रिय झाली. सीरिजमध्ये तिनं दिलेल्या बोल्ड दृश्यांनी अनेकांना घायाळ केलं. अशी ही अभिनेत्री आता म्हणे एका व्हिडीओच्या माध्यमातून पुन्हा चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

यावेळी रसिकानं भन्नाट पोझ दिल्याचं पाहायला मिळत आहे. स्पष्ट सांगावं तर कायमच बोल्ड रुपात समोर येणाऱ्या रसिकानं या व्हिडीओच्या निमित्तानं एक ट्रेंड पूर्ण केला आहे.

इन्स्टा रिलमधून तिनं तो शेअरही केला आहे. हा रिल दिसायचा सोपा दिसतो पण मुळात तो फारच कठीण आहे, असा इशाराही तिनं दिला आहे.

स्वत:च्याच फोन कॅमेरातून तिनं हा व्हिडीओ शूट केला आहे. मुख्य म्हणजे हा रिल तिला सुरेखपणे जमलाही आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika (@rasikadugal)

ट्रेंड फॉल करायचा म्हणून इतर सेलिब्रिटींप्रमाणंच रसिकानंही काहीतरी नवं करुन पाहिलं आणि यात ती यशस्वीसुद्धा ठरली.

आव्हानात्मक भूमिका साकारण्यासबोत रसिकालाही हे ट्रेंड प्रकरणही चांगलंच जमलेलं दिसत आहे.

दरम्यान, वेब सीजिज विश्वात नावारुपास आलेल्या या अभिनेत्रीनं आजवर बऱ्याच आव्हानात्मक भूमिकांना न्याय दिला आहे. ‘मिर्झापूर’, ‘आऊट ऑफ लव्ह’ ही त्यातलीच काही नावं. तिनं साकारलेली आणि तुम्हाला आवडलेली भूमिका कोणती?