Bhagyashree Mote: मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी; अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू

Bhagyashree Mote Sister Death: भाग्यश्री मोटेला तिच्या बहिणीच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या बहिणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. भाग्यश्रीच्या बहिणीच्या चेहऱ्यावरही जखमेच्या खुणा आहेत.

Updated: Mar 14, 2023, 07:16 PM IST
Bhagyashree Mote: मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी; अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू title=

Bhagyashree Mote Sister Death: मराठी चित्रपटसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहीणचा मृत्यू झाला आहे. अभिनेत्रीची बहीण मधु मार्कंडे हिचा मृतदेह पिंपरी चिंचवड वाकड येथे सापडला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

अभिनेत्रीच्या बहिणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे
भाग्यश्री मोटेला तिच्या बहिणीच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या बहिणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. भाग्यश्रीच्या बहिणीच्या चेहऱ्यावरही जखमेच्या खुणा आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास कसून करत असून अभिनेत्रीच्या बहिणीची ही अवस्था कोणी आणि का केली याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अभिनेत्रीच्या बहिणीचा मृत्यू कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, मधु मार्कंडे ही मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे यांची बहीण आहे. मधु तिच्या मैत्रिणीसोबत वाकड परिसरात केक बनवण्याचा व्यवसाय करत असल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी मधू तिच्या मैत्रिणीसोबत भाड्याची खोली पाहण्यासाठी गेली होती. खोली पाहिल्यानंतर मधूला अचानक चक्कर आली आणि दात तिचे घासले.  

मधूच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. अशा स्थितीत मधूचा मृत्यू संशयास्पद मानला जात आहे. तिचा खून झाल्याचा संशय कुटुंबीयांना आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.  तिच्या मित्राने तिला तातडीने खासगी रुग्णालयात नेले. तिथे मधूवर उपचार होऊ शकले नाहीत आणि त्यांना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आलं, तेथे तपासाअंती मधूला मृत घोषित करण्यात आलं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

भाग्यश्रीने पोस्ट शेअर करत दिली माहिती
माझ्या प्रिय बहिणीने या जगाचा निरोप घेतला आहे! माझी आई, बहीण, मित्र, विश्वासू आणि काय नाही? तू माझा पाया होतीस. माझ्या संपूर्ण अस्तित्वाचा केंद्रबिंदू होतीस. तुझ्याशिवाय मी पूर्णपणे हरवले आहे. तुझ्याशिवाय या आयुष्याचं मी काय करू? तू मला ते कधीच शिकवलं नाहीस. मृत्यू अटळ आहे पण मी तुला जाऊ देत नाही. मी कधीच करणार नाही. कधीच नाही. अशी पोस्ट शेअर करत भाग्यश्रीने तिच्या बहिणीला श्रद्धांजली वाहिली आहे.