मुंबई : बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्यांचा विषय निघाला तर सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे अभिनेते राजेंद्र कुमार यांचं. त्यांनी गाजवलेला काळ हा सिलव्हर जुवली होता. त्यांचा कोणत्याही चित्रपटासाठी प्रेक्षकांची एकचं गर्दी असायची. प्रत्येक शो हाऊस फुल... राजेंद्र कुमार जेवढे चांगले अभिनेते होते , तेवढेचं चांगलं त्यांचं व्यक्तीमत्व देखील होतं. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर राजेंद्र कुमार आणि मनोज कुमार यांचे अनेक किस्से आज देखील प्रसिद्ध आहेत.
तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा मनोज कुमार स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी स्ट्रगल करत होते. याचं काळत त्यांची ओळख राजेंद्र कुमार यांच्यासोबत झाली. ओळख झाली, गप्पा होवू लागण्या, ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. मनोज कुमार हे राजेंद्र कुमार यांना भाऊ मानू लागले. जेव्हा मनोज कुमार यांना त्यांचा पहिला चित्रपट 'पिया मिलन की रात' मिळाला. तेव्हा त्यांची 1000 रूपये पहिली कमाई झाली.
आपल्या आवडत्या क्षेत्रात पहिली कमाई मिळाल्यामुळे मनोज कुमार अत्यंत आनंदी होते. पैसे मिळाल्यानंतर ते थेट राजेंद्र कुमारांकडे गेले. तेव्हा राजेंद्र कुमार चित्रीकरणात व्यस्त होते. मनोज कुमार, राजेंद्र कुमारांजवळ गेले आणि ते 1000 रूपये त्यांच्या पायावर ठेवले. हे सर्व पाहुन राजेंद्र कुमार अत्यंत भावूक झाले.
त्यांनी मनोज कुमारांना मिठी मारली. पायाजवळ ठेवलेले पैसे उचलले आणि त्या 1000 रूपयांमध्ये 100 रूपये अजून टाकून म्हणाले, 'आता हे आकराशे रूपये झाले आहेत. जे शुभ मानले जातात...' तेव्हा ते फार आनंदी झाले. मनोज कुमार यांना पहिला चित्रपट मिळाल्यानंतर राजेंद्र कुमार यांनी सेटवर सर्वांना मिठाई वाटली.