धर्मेंद्र यांनी नोटांनी भरलेली बॅग दिग्दर्शकाच्या पत्नीला दिली आणि म्हणाले.....

प्रत्येक कलाकाराला त्याच्या यशाचं ध्येय गाठण्यासाठी अनेक खस्ते खावे  लागतात. 

Updated: May 5, 2021, 04:55 PM IST
धर्मेंद्र यांनी नोटांनी भरलेली बॅग दिग्दर्शकाच्या पत्नीला दिली आणि म्हणाले..... title=

मुंबई : आज असा भारतीय नागरिक नाही ज्यांना अभिनेते धर्मेंद्र माहित नसतील. धर्मेंद्र यांच्याबद्दल रोज एकतरी बतमी प्रसिद्ध होतेचं. शिवाय त्यांच्या चाहते फक्त भारतातचं नाही तर साता समुद्रपार देखाल आहेत. प्रत्येक कलाकाराला त्याच्या यशाचं ध्येय गाठण्यासाठी अनेक खस्ते खावे  लागतात. धर्मेंद्र यांनी देखील हा अवघड प्रवास केला आहे. या प्रवास त्यांना साथ मिळाली ती म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांची. जेव्हा त्यांच्या 'शोला और शबनम' चित्रपटाच्या काही भागाचं चित्रीकरण पूर्ण झालं तेव्हा त्यांना बिमल रॉय यांना ते पाहाण्यासाठी आग्रह केला. बिमल रॉय तयार देखील झाले. 

पण 'शोला और शबनम' चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी त्यांना नकार दिला. तरी देखील धर्मेंद्र शांत बसले नाहीत, त्यांनी थेट गाठलं चित्रपटाच्या एडिटरला. बिमल रॉय यांनी धर्मेंद्र यांचं अभिनय पाहिलं आणि 'बंदिनी' चित्रपटात धर्मेंद्र यांना कास्ट केलं. त्यानंतर बिमल आणि धर्मेंद्र यांनी मिळून अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. 

काही वर्षांनंतर बिमल यांनी धर्मेंद्र आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यासोबत 'चैताली' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली. चित्रपटाचं चित्रीकरण अर्ध्यावर पोहोलचं आणि बिमल यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर पतीचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नीने स्वतःच्या खांद्यावर घेतली. पण त्यांना कोणाची साथ मिळाला नाही. 

शर्मिला टागोर यांनी देखली चित्रपटास नकार दिलाय ही गोष्ट जेव्हा धर्मेंद्र यांना कळाली तेव्हा त्यांनी बिमल यांच्या घराची वाट धरली. बिमल यांच्या पत्नीला वाटलं की  धर्मेंद्र देखील पैसे मागायला आले असतील. पण काही उलटचं घडलं. तेव्हा धर्मेंद्र म्हणाले, की 'बिमल यांचे माझ्यावर खुर उपकार आहेत. आज मला ते उपकार फेडण्याची संधी मिळाली आहे.'

असं म्हणतं त्यांनी नोटांनी भरलेली बॅग उघडली. अशा प्राकरे बिमल रॉय यांचा  'चैताली' चित्रपट पूर्ण झाला. धर्मेंद्र यांच्या सांगण्यावरून अभिनेत्री सायरा बानो चित्रपटात काम करण्यास तयार झाल्या. तर  ऋषिकेश मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाखाली 'चैताली' चित्रपट पूर्ण झाला.