KBC तून 75 लाख जिंकूनही नवऱ्याला काहीच देणार नाही, असं म्हणणाऱ्या स्पर्धक आहेत तरी कोण?

 स्पर्धकाने असंच एक दिलेलं उत्तर ऐकून बीग बीही थक्क झाले आहेत. 

Updated: Aug 27, 2022, 09:58 PM IST
KBC तून 75 लाख जिंकूनही नवऱ्याला काहीच देणार नाही, असं म्हणणाऱ्या स्पर्धक आहेत तरी कोण? title=

Kaun Banega Crorepati 14 Promo: क्विझ रिएलिटी शो 'कौन बनेगा करोडपती 14' लोकांना खूप आवडतो आहे. या शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनीही आपल्या खास शैलीने प्रत्येक एपिसोड खास बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. शोमध्ये आलेल्या स्पर्धकांसोबत बिग बींनी गप्पा मारतात आणि मज्जामस्ती करतात.

कधीकधी स्पर्धक अमिताभ बच्चन यांना त्यांच्या अफलातून वक्तव्यांनी आश्चर्यचकित करून सोडतात असेच काहीसे KBC च्या नुकत्याच एका भागात घडलं आहे. स्पर्धकाने असंच एक दिलेलं उत्तर ऐकून बीग बीही थक्क झाले आहेत. 

हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला बिग बींनी विचारले की, बक्षिसाच्या रकमेतून त्या आपल्या पतीला काय गिफ्ट देणार? तर मेगास्टार अमिताभ बच्चनही यावर त्यांचे उत्तर ऐकून थक्क झाले. बंगळुरूच्या अनु वर्गीस या शोच्या नव्या भागात स्पर्धक म्हणून दिसणार आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अनु तिच्या पतीसोबत स्पर्धेत सहभागी झाली होती. 

प्रोमो व्हिडिओमध्ये अनु 50 लाख रुपये जिंकताना दिसत आहे. अमिताभ अनू यांना विचारतात, 'तूम्ही तुमच्या काय पतीला गिफ्ट द्याल?' यावर त्या गमतीत म्हणाल्या- 'मी काही देणार नाही'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनु 75 लाख रुपये जिंकतात. तेव्हा अमिताभ त्यांना पुन्हा विचारतात की ''तूम्ही तुमच्या पतीला आताही काहीच देणार नाही का?' मग त्यावर अनु म्हणतात की 'ते मला कधी गिफ्ट देत नाही, म्हणून मीही देत ​​नाही'. हे उत्तर ऐकून खुद्द अमिताभ बच्चनही त्यांच्याकडे चमकून पाहतात आणि या गमतीवर सगळेच हसतात.