Urfi Javed Topless Photoshoot : उर्फी जावेदचं टॉपलेस फोटोशूट, युजर्स म्हणतात ही तर बर्फी!

उर्फी जावेद जेंव्हा केंव्हा बोल्ड फोटोशूट करते तेंव्हा ती स्वतःला व्यवस्थित प्रेझेंट करताना पाहायला मिळते. उर्फीने तिच्या या फोटोशूटमध्येही आपली बॉडी फ्लॉन्ट केली आहे. 

Updated: Aug 27, 2022, 09:58 PM IST
Urfi Javed Topless Photoshoot : उर्फी जावेदचं टॉपलेस फोटोशूट, युजर्स म्हणतात ही तर बर्फी! title=

Urfi javed Topless Photoshoot: उर्फी जावेद कायम आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत असणारं नाव. बोल्ड फॅशन सेन्समुळे उर्फीबाबतच्या अनेक बातम्या तुम्ही याआधीही वाचल्या असतील. ती तिचे हटके फोटोशूट्स कायम इंस्टावर किंवा सोशल मीडियावर शेअर करत असते. हे फोटोशूट्सही तुम्ही पहिले असतील. मात्र, आता उर्फीने जे फोटोशूट केलं आहे ते पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल, हीचं नाव उर्फी नव्हे बर्फी असायला हवं होतं. 

इंस्टाग्राम सेलेब उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या फॅन्सना घायाळ करायला आली आहे. यावेळी उर्फीने जे केलंय ते करण्याची हिम्मत कदाचितच कुणी करेल. उर्फीने आता चक्क टॉपलेस फोटोशूट केलेलं पाहायला मिळतंय. मात्र या फोटोशूटमध्ये एक ट्विस्ट देखील आहे. 

उर्फी जावेद हिने टॉपलेस फोटोशूट केलं आहे. यावेळी उर्फीने तिच्या फोटोशूटमध्ये अंगाला चांदीचा वर्ख लावलेला पाहायला मिळतोय. याच चांदीच्या वर्खाने उर्फीने तिचे बॉडी पार्टस कव्हर केले आहेत. उर्फीने या नुकत्याच केलेल्या फोटोशुटचे सर्व फोटो इंस्टावर टाकले आहेत. 

उर्फीच्या फॅन्सच्या काय आहेत प्रतिक्रिया?

उर्फी जावेद हिच्या या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. उर्फीने उचललेल्या या बोल्ड पावलाचं चाहते कौतुक करताना थांबत नाही. अनेक जण या फोटोवर हार्ट ईमोजी टाकत ही तर 'बर्फी' अशी प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, काहींना उर्फीचं हे फोटोशूट पचलेलं नाही. उर्फीने आता हद्द केल्याच्या प्रतिक्रियाही तिच्या इंस्टावर आलेल्या आहेत.   

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेद जेंव्हा केंव्हा बोल्ड फोटोशूट करते तेंव्हा ती स्वतःला व्यवस्थित प्रेझेंट करताना पाहायला मिळते. उर्फीने तिच्या या फोटोशूटमध्येही आपली बॉडी फ्लॉन्ट केली आहे. 

topless photoshoot of urfi javed fans goes crazy wach all photos