Katrina Vicky Secret Wedding: बी-टाऊनमधील स्टार कपल कतरिना-विकी यांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. अनेकांना कतरिना-विकी लग्न करणार यावर विश्वास बसत नव्हता. त्यात दोघांनी स्टार कपलने आपलं प्रेम लग्न हे सर्व कसं कायम गुपित ठेवलं होतं. त्याचा लग्नही खूप प्राइव्हेट ठेवण्यात आलं होतं. या लग्नाचे आणि मेहंदी-हळदीचे सुंदर अस्मरणीय फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
कतरिना आणि विकीने लग्न एवढ्या खाजगीत का केलं याबद्दलही अनेक चर्चा रंगल्या होत्या. या दोघांनीही यासंदर्भांत काही सांगितलं नव्हत.पण अखरे खुद्द कतरिना कैफने गुपचूप लग्नाचं गुपित उघडलं केलं आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर होते. त्यावेळी पत्रकारांनी परत तोच प्रश्न विचारला जो तुमच्या आणि आमच्या मनात आहे. (katrina kaif on her secret wedding with vicky kaushal reason revealed entertainment gossips)
जेव्हा कतरिनाला विचारण्यात आले की तिने गुपचूप लग्न का केले, तेव्हा ती म्हणाली, 'मला वाटते की ते खाजगी ठेवण्यापेक्षा, कोविड -19 संबंधित निर्बंधांमुळे आम्हाला भाग पाडले गेले. माझ्या कुटुंबातील सदस्यांसोबतही हे घडले, त्यामुळे आम्हाला ते गांभीर्याने घ्यावं लागलं.
कतरिना म्हणाली की, 'मला वाटतं की हे वर्ष खूप चांगलं गेलं आहे, पण आम्हाला कोविडमुळे थोडे अधिक सावध राहायचं होतं, मात्र लग्न खूप चांगलं झालं. मला वाटतं की आम्ही दोघे खूप आनंदी आहोत.'