'या' कारणामुळे करिश्मा आणि करीना कपूर कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसल्या नाहीत...

करीना आणि करिश्मा दोघीही करिअरमध्ये सक्सेसफुल असल्या तरी कधीही एकत्र का दिसल्या नाहीत.

Updated: Feb 16, 2022, 06:09 PM IST
'या' कारणामुळे करिश्मा आणि करीना कपूर कोणत्याही चित्रपटात एकत्र दिसल्या नाहीत... title=

मुंबई : करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्रिंपैकी एक आहे. तिने तिच्या अभिनयाने आणि तिच्या सौंदर्याने लोकांना वेड लावलं आहे. आज करीनाने नवाब सेफ अली खानसोबत लग्न केलं आहे. करीनाची बहिण करिश्मा आज बॉलिवूडमध्ये फराशी दिसत नसली तरी, तिने सुरुवातीच्या काळात अनेक हिट चित्रपट दिलेत. राजा हिंदूस्तानीमुळे तर करिश्मालाने सगळ्यांच्याच मनावर जादू केली होती. परंतु दोन्ही बहिणींनी कधीही बॉलिवूडमध्ये एकत्र काम का केलं नाही? हा प्रश्न लोकांना पडला आहे.

करीना आणि करिश्मा दोघीही करिअरमध्ये सक्सेसफुल असल्या तरी कधीही एकत्र का दिसल्या नाहीत. यागोष्टीचा खुलासा आता दोन्ही बहिणींनी केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, करीना कपूरला हा प्रश्न जेव्हा एका मुलाखतीत विचारला गेला, तेव्हा तिने सांगितले होते की, तिला नेहमी तिच्या मोठ्या बहिणीसोबत चित्रपटात काम करायचे होते, परंतु तिला अशी कोणतीही स्क्रिप्ट मिळाली नाही, ज्यावर त्या दोघीही एकत्र काम करू शकतील.

परंतु तसे पाहाता करीनाने अनेक वेळा इतर अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली होती. परंतु त्यामध्ये ती करिश्मासोबत दिसली नाही. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांना झुबेदाचा सिक्वेल ऑफर करण्यात आला होता परंतु यासाठी त्यांनी नकार दिल्याचे कळत आहे.

दुसरीकडे, जेव्हा हा प्रश्न करिश्मा कपूरला विचारण्यात आला, तेव्हा त्यावर उत्तर देताना ती म्हणाले की, मला करीना कपूरसोबत अनेक चित्रपटांची ऑफर आली होती, परंतु आम्हा दोघी बहिणींनी एका चित्रपटात सहकलाकार करणे ही खूप मोठी गोष्ट असेल, त्यामुळे आम्हाला असा कोणताही चित्रपट करायचा नाही.

यासोबतच मुलाखतीत करिश्मा कपूरने सांगितले होते की, ती आणि करीना एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहेत, मी खुप जुन्या पद्धतीची आहे तर करीना नेहमीच मला सरप्राईज करते. करिश्मा कपूरने एका रिऍलिटी शोमध्ये सांगितले होते की, तिचे आणि करीना कपूरमध्ये कपड्यांवरून नेहमीच भांडण होत असे.