'दबंग-3' च्या आयटम गाण्यावर थिकणार करिना

दबंग सिनेमाच्या दोन्ही भागांनी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. सिनेमांच्या आयटम गाण्यांनी तर सगळ्यांच घायाळ केले होते. 

Updated: Feb 3, 2019, 03:12 PM IST
'दबंग-3' च्या आयटम गाण्यावर थिकणार करिना title=

मुंबई: अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षीत सिनेमा 'दबंग-3' लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. दबंग सिनेमाच्या दोन्ही भागांनी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते.सिनेमांच्या आयटम गाण्यांनी तर सगळ्यांच घायाळ केले होते. 'दबंग-3' सिनेमाच्या आयटम गाण्यावर करिना कपूर खान थिरकताना दिसणार आहे. सिनेमात गाण्याचे दिग्दर्शन प्रभुदेवा करणार आहेत. दबंग सिनेमाच्या दुसऱ्या भारात करिनाने 'फेविकोल से' या आयटम गाण्याने चाहत्यांची मने जिंकली होती. सूत्रांच्या सांगण्यानुसार अश्वनी मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खान हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार असून उर्वरीत कलाकारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. सिनेमाची शूटिंग मार्च महिन्यात सुरु होणार आहे. सिनमाचे सेट बनवण्याचे काम अंतीम टप्यात आले आहे.सिनेमाची निर्मिती अरबाज खान करणार आहेत.
दबंग सिनेमात 'मुन्नी बदनाम हुई' हे आयटम गाणे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. पहिल्या भागात प्रदर्शित झालेल्या या गाण्याला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले. अभिनेत्री मलायका आरोरावर चित्रित करण्यात आलेल्या या आयटम गाण्याचे दिग्दर्शन ललीत पंडित यांनी केले होते. तर दबंग-3 सिनेमातील आयटम गाण्यात बेबो झळकणार आहे. 
2010 मध्ये सलमानचा 'दबंग' सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमातील सलमानच्या अभिनयाचे गोडवे जगभर पसरले होते. याच सिनेमाच्या दुसऱ्या भागाने सुद्धा चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. सलमान सध्या अली अब्बाज दिग्दर्शित 'भारत' सिनेमाचे काम पूर्ण करत आहे. त्यानंतर दबंग 3 सिनेमाच्या शूटिंगमध्ये तो व्यग्र असणार आहे. वर्षाअखेरीस यशाच्या उच्च शिखरावर असलेली रोहीत आणि सलमानची जोडी एकत्र काम करणार आहे.