मुंबई : बॉलिवूडची बेबो करिना कपूर फिटनेस फ्रिक आहे, हे आपल्याला ठाऊक आहे. आपल्या फिटनेस, फिगरबद्दल ती अतिशय सजग असते. करिनाचा झीरो फिगरचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये चांगलाच गाजला. त्यानंतर प्रेग्नेसीमध्ये वाढलेले वजन करिनाने झटपट कमी करुन सर्वांना आश्चर्यचकीतच केले.
पण करिना कपूचा हा फिटनेस फंडा जगजाहिर झाला आहे. फिट राहण्यासाठी करिना जीममध्ये प्रचंड मेहनत घेते. तिचा वर्कआऊट व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात ती जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. या व्हिडिओत करिनासोबत फिटनेस फ्रिक अभिनेत्री मलायका अरोरा देखील आहे.
हा व्हिडिओ जीम ट्रेनर नम्रता पुरोहितने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत दोन्ही अभिनेत्री पिलाटे एक्सरसाईज करत आहेत. त्यामुळे पेशी मजबूत होतात. शरीराची लवचिकता आणि स्ट्रेंथ वाढते. त्याचबरोबर डोके शांत राहण्यास मदत होते.
काही दिवसांपूर्वी करिना कपूरचा वीरे दी वेडिंग सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर करिना गुड न्यूज सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षय कुमारही प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा १९ जुलै २०१९ ला प्रदर्शित होईल.