"माझ्या गाडीचा पाठलाग सुरु केला अन् तेव्हा...", काजोलनं सांगितला पापाराजींचा 'तो' किस्सा

Kajol : काजोलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पापाराझी आणि प्रायव्हसीवर वक्तव्य केलं आहे. याविषयी बोलताना काजोलनं तिला आलेला पापाराझींचा एक अनुभवही सांगितला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 15, 2023, 05:20 PM IST
"माझ्या गाडीचा पाठलाग सुरु केला अन् तेव्हा...", काजोलनं सांगितला पापाराजींचा 'तो' किस्सा title=
(Photo Credit : Social Media)

Kajol : बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही सध्या द ट्रायल या सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये काजोलनं दिलेले किसिंगचे सीन हे चांगलेच चर्चेत आहेत. तिनं 29 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर किस केलं आहे. तर इतकंच नाही तर तिनं दोन अभिनेत्यांना या सीरिजमध्ये किस केलं आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्य झालं तर अनेकांनी तिच्या या बदलाची स्तुती केली आहे. दरम्यान, काजोल सध्या तिच्या या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी काजोलनं पापाराझींच्या कल्चरवर वक्तव्य केलं असून कशा प्रकारे त्यांनी तिच्या गाडीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली होती. 

'मिस मालिनी' ला दिलेल्या मुलाखतीत काजोलनं पापाराझी कल्चरविषयी वक्तव्य केलं आहे. यावेळी काजोल म्हणाली की "मला वाटतं की आता हे अती झालं आहे. हे एका पेंड्युलमसारखं आहे, जे एकदा सुरु होतं आणि मग त्याला कसली गरज नाही. आता तर त्याला सगळ्यात जास्त मूमेंटम मिळाला आहे. पण आता हे कमी झालं पाहिजे कारण आपण कलाकार आहोत आणि प्रत्येक गोष्टीसाठी एक बॅलेन्स असला पाहिजे. तेव्हा हे कमी होईल."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काजोल तिला आलेला अनुभव सांगत पुढे म्हणाली, काही दिवसांपूर्वी मी वांद्रेत होते आणि पापाराझींनी माझी गाडी पाहिली असेल. त्यानंतर त्यांनी माझा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तेव्हा मी कोणत्याही शूटसाठी बाहेर पडले नव्हते, मी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी नव्हते. मी कोणत्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये नव्हते. आता मी एक स्टार आहे तर मी हे बोलू शकत नाही की माझा पाठलाग का करत आहात? याच कारण हे मी एक स्टार आहे. हेच आहे. मी स्टार असल्यानं माझ्या आजुबाजूला नेहमीच 7-8 लोक कॅमेरा घेऊन असतात. मी काहीही केलेलं असो. त्यामुळे आम्हाला नेहमीच काळजी घ्यावी लागते. 

हेही वाचा : कॅन्सरचा प्रवास सांगत अतुल परचुरे म्हणाले, "लग्नाच्या 25 व्या वाढदिवशी आम्ही..."

दरम्यान, फक्त काजोल नाही जिला प्रायव्हसी आवडते. या आधी देखील अनेक कलाकारांनी प्रायव्हसीवर वक्तव्य केलं होतं. त्यात तापसी पन्नू, जया बच्चन आहेत. या शिवाय काही दिवसांपूर्वी आलिया भट्टचा तिच्या घराच्या गॅलरीतील फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर आलियानं यावर प्रायव्हसीची काळजी घ्या असं सांगितलं तर त्यावर तिच्या पाठिंबा देत अनेक कलाकार समोर आले होते. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. अनुष्का शर्मा ही नेहमीच प्रायव्हसी किती महत्त्वाची आहे हे सांगताना दिसते.