Nandi Hills: थंडीच्या दिवसात फिरायला (Tour and travel) जाण्याची मज्जाच काही और आहे. फक्त उन्हाळ्यातच नाही तर अगदी थंडीतही अनेकजण हिल स्टेशनवर जायला पसंत करतात. हिवाळ्याच्या सिजनमध्ये (Winter Season Travel) अनेकांना हिमवर्षाव पाहण्यासाठी हिल स्टेशनवर जायला आवडते. पण सगळ्यांनाच हिमवर्षाव पाहायला जायचे नसते. काही लोकांना अशा ठिकाणी जायचे आहे जिथे सर्वत्र हिरवळ असेल आणि हवामान देखील आल्हाददायक असेल. अशी ठिकाणी अनेकदा दक्षिण भारतात (South India) आहेत. तुम्हालाही अशा ठिकाणी जायचं असल्यास तुम्ही कर्नाटकला भेट देऊ शकता. बेंगळुरूच्या (Bangalore) जवळ भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. अशी एक जागा बंगळुरूपासून अगदी ५५ किलोमीटर अंतरावर आहे. आज आपण या हिल स्टेशनबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे तुम्ही हिवाळ्यात येथे भेट देण्याचा विचार करू शकता. चला जाणून घेऊया त्या ठिकाणाबद्दल...
कर्नाटक मधील नंदी हिल्स या जागेबद्दल आम्ही बोलत होतो. नंदी हिल्स हे अतिशय सुंदर आणि शांत ठिकाणांपैकी एक आहे. जर तुम्ही बंगलोर शहरात राहत असाल तर वीकेंडला इथे जाण्याचा प्लॅन करू शकता. याशिवाय भारतातील कोणत्याही ठिकाणाहून बंगलोरला सहज पोहचू शकता.
हे ही वाचा: शक्ती कपूर यांनी अर्चना पूरण सिंह यांना ५० हजार रुपयांची ऑफर का दिली? वर्षांनंतर उघड झाले रहस्य
जर तुम्हाला फोटोग्राफी करायची आवडत असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता. येथे तुम्हाला सूर्योदयाची उत्कृष्ट झलक आणि निसर्गाची अद्भुत दृश्ये क्लिक करण्याची संधी मिळेल. नंदी हिल्सवरून सूर्योदयाचे दृश्य अतिशय विलोभनीय आहे. येथे ट्रेकिंग आणि सायकलिंग करण्याची संधी मिळते. याशिवाय इथल्या अनेक ऐतिहासिक नद्या आणि ठिकाणे पाहण्याची संधीही मिळते.
नंदी हिल्सला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा हिवाळ्याचा सीजन बेस्ट मानला जातो. यावेळी तिथले हवामान आल्हाददायक आहे. मार्च ते मे या काळात येथील हवामान इतर राज्यांच्या तुलनेत थोडे थंड असते. मात्र दिवसा कडक ऊन आणि उष्णता असते. येथे पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या काळात भरपूर पाऊस पडतो. पावसाळ्यात नैसर्गिक सौंदर्य द्विगुणित होते, परंतु पावसाळ्यात डोंगरावर फिरणे कठीण होते.
हे ही वाचा: साऊथचा ॲक्शन हिरो अजित कुमारचा भीषण अपघात, धक्कादायक Video Viral
नंदी हिल्सभोवती फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. टिपू ड्रॉप हे तेथील सर्वात जुन्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण डोंगराच्या माथ्यावर एका खडकावर वसलेले आहे. त्याच्या माथ्यावरून डोंगररांगांचे अप्रतिम दृश्य दिसते. याशिवाय तुम्ही तेथील मंदिरातही जाऊ शकता. योगानंदेश्वर मंदिर येथे डोंगर शिखराच्या काठावर आहे जेथे दर्शनासाठी जाता येते. याशिवाय ब्रह्मश्रममधील गुहा शोध, अमृता सरोवर, चिक्कबल्लापूर, मुद्देनहल्ली, मकालीदुर्ग किल्ला, लेपाक्षी आणि देवनहल्ली किल्ला अशी ठिकाणे पाहण्याची संधी मिळते.