'पैशांसाठी हिनं...', अभिनेत्री जुही चावला या कारणामुळे होतेय ट्रोल

जुही चावला ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Updated: Nov 13, 2022, 09:58 AM IST
'पैशांसाठी हिनं...', अभिनेत्री जुही चावला या कारणामुळे होतेय ट्रोल title=

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलानं (Juhi Chawala) तिच्या करिअरमध्ये सर्व मोठ्या कलाकार आणि स्टार्ससोबत काम केलं आहे. लहान वयात मिस इंडियाचा खिताब पटकावणाऱ्या जुही चावलानं 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जुही तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. जुही आज जरी चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी तिचे लाखो चाहते आहेत. इतकं यश मिळवूनही जुही चावलाला तिच्या कामासाठी नव्हे तर नको त्या गोष्टींसाठी ट्रोल होते. 

जुहीनं तिच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठ्या उद्योगपती जय मेहता यांच्याशी लग्न केलं. (Juhi Chawala Marriage)  जुहीच्या लग्नाच्या निर्णयाला लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली. लोकांनी अनेक गोष्टी सांगितल्या की तिने पैशासाठी एका म्हाताऱ्याशी लग्न केले. आजही जुहीला या गोष्टींचा सामना करावा लागतो, पण ती या गोष्टींचा तिच्यावर कधीही परिणाम होऊ देत नाही आणि तिचं आयुष्य आनंदानं जगते. 

हेही वाचा : 'झाडांच्या पाठीमागे...', जया बच्चन यांनी सांगितला त्यांच्या काळात येणार Periods चा अनुभव

करिअरच्या शिखरावर गेल्यानंतर जुहीनं लग्न करण्याचा विचार केला होता. रिपोर्ट्सनुसार, जुहीने तिच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठ्या उद्योगपती जय मेहतासोबत गुपचूप लग्न केलं. अभिनेत्रीच्या या निर्णयावर अनेकांनी तिला ट्रोल केलं, तर नेटकरी जुहीला नको ते म्हणाले. (Juhi chawala got trolled netizens says she got married for money) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

1984 मध्ये मिस इंडिया झाल्यानंतर जुहीनं 1986 मध्ये पहिला चित्रपट केला होता. 'सल्तनत' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जुहीनं अनेक कन्नड चित्रपटांमध्येही काम केले. यानंतर जुहीनं 1988 मध्ये प्रदर्शित झालेला 'दी कयामत से कयामत तक' हा पहिला हिट चित्रपट बनवला.