नवी दिल्ली: स्वातंत्रदिनाचा उत्साह संपूर्ण देशभरात साजरा केला जात असताना टीव्ही स्टार्स कसे मागे राहतील ? टीव्हीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री हिना खानने देखील वेगळ्या पद्धतीने स्वातंत्रदिन साजरा केला. स्वतंत्रतादिनानिमित्त तिने ‘वंदे मातरम’ गाऊन देशाप्रती आदर व्यक्त केला आहे. फोटोवरून असे दिसून येते की, हिना अगदी तल्लीन होऊन सुरातालाचे भान ठेवून ‘वंदे मातरम’ गात आहे. हे गाणे गाण्यासाठी तिने १५ ऑगस्ट या दिवसाची निवड केली. एका शो साठी तिने हे गाणे गायले असून काही दिवसांनी ते गाणे चॅनेल प्रदर्शित करेल.
या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर तिला प्रेक्षकांकडून अनेक प्रतिक्रीया मिळाल्या.
बॉलिवूड.कॉम या वेबसाईटच्या वृत्तानुसार हिनाने एका मुलाखतीत सांगितले की,
''वंदे मातरम गाणे हा माझा वैयक्तिक निर्णय होता. त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यावर हरकत घेण्याचा अधिकार कोणाला नाही. हा माझा वैयक्तिक निर्णय आणि आवड आहे."
हिना खान टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेनंतर तिने 'खतरों के खिलाडी' या टीव्ही शो मध्ये सहभाग घेतला. यात देखील तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली. बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल सोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटोज तुने सोशल मिडीयावर शेयर केले होते. तेव्हा ती चर्चेत आली होती. तिच्या फोटोजना फॅन्सकडून चांगलीच पसंती मिळाली होती. हिना आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या अफेर्सचे अनेक किस्से चर्चेचा विषय ठरतात.