कन्फर्म ! ‘साहो’त ही अभिनेत्री असणार प्रभासची हिरोईन

‘बाहुबली २’ च्या घसघशीत यशानंतर अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमात प्रभासची हिरोईन कोण असणार, याची चर्चा रंगली आहे.

Updated: Aug 16, 2017, 10:39 AM IST
कन्फर्म ! ‘साहो’त ही अभिनेत्री असणार प्रभासची हिरोईन title=

मुंबई : ‘बाहुबली २’ च्या घसघशीत यशानंतर अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमात प्रभासची हिरोईन कोण असणार, याची चर्चा रंगली आहे.

या सिनेमाच्या मुख्य अभिनेत्रीसाठी अनेक नावांची चर्चा झाली. त्यात बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा समावेश होता. आता या सिनेमात प्रभाससोबत कोण दिसणार ? यावरून पडदा उठवला गेला आहे. 

‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासच्या आगामी सिनेमातील मुख्य अभिनेत्रीच्या रोलसाठी अभिनेत्री श्रद्धा कपूर फायनल करण्यात आली आहे. सिनेमाच्या त्यांनी याची अधिकृत घोषणा केलीये. निर्माते म्हणाले की, ‘श्रद्धा या रोलसाठी परफेक्ट आहे. आम्ही तिला या सिनेमात घेऊन उत्साहीत आहोत’. त्यामुळे आता या दोघांची जोडी रूपेरी पडद्यावर काय धमाल करणार याकडे सर्वांच्या नजरा असेल. 

मीडिया रिपोर्टनुसार, ‘साहो’ सिनेमाचं डबिंग केलं जाणार नाही. तर या सिनेमाचं तेलुगू, तमिळ आणि हिंदीत शूट केलं जाणार आहे. याआधी या सिनेमासाठी अनुष्का शेट्टीच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र तिच्या वाढत्या वजनामुळे तिला या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 

तेलुगूमध्ये तयार होत असलेल्या या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी कोणत्याही डबिंग आर्टीस्टची मदत घेतली जाणार नाही. स्वत: कलाकार हिंदी डबिंग करणार आहेत. या सिनेमाचे स्टंट हॉलिवूडचे प्रसिद्ध स्टंट डिरेक्टर केनी बेट्स हे कोरिओग्राफ करणार आहेत. सिनेमाचं शूटींग अबूधाबीसहीत अनेक लोकेशनवर होणार आहे. १५० कोटीचं बजेट असलेल्या या सिनेमासाठी व्हिएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे.