Grammy Awards 2024 : संगीत क्षेत्रामधील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेल्या ग्रॅमी पुरस्कार 2024 ची घोषणा करण्यात आली आहे. 66 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारतासाठी खास ठरला आहे. कारण भारतीय गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांच्या 'शक्ती' या बँडच्या 'दिस मोमेंट' या अल्बमला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा किताब मिळाला आहे. या अल्बममध्ये आठ गाणी आहेत.
ग्रॅमी पुरस्कार हा संगीतासाठी दिला जाणारा जगातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. हा पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिसमधील एरिना येथे आयोजित केला गेला होता. ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये तबलावादक झाकीर हुसेन यांनी इतिहास रचला आहे. झाकीर हुसेन यांनी तीन ग्रॅमी पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. यासोबतच आपल्या सुंदर बासरी वादनासाठी ओळखले जाणारे भारताचे राकेश चौरसिया यांनी दोन ग्रॅमी पुरस्कारही जिंकले आहेत. या यादीत भारतीय गायक शंकर महादेवनचे नाव देखील आहे. शंकर महानदेवन यांच्या पोश्तो गाण्यासाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.
लॉस एंजेलिसमध्ये रविवारी ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी युनायटेड स्टेट्सच्या रेकॉर्डिंग अकादमीद्वारे कलाकारांना ग्रॅमी पुरस्कार दिले जातात. प्रसिद्ध विनोदी अभिनेता ट्रेव्हर नोह याने सलग चौथ्यांदा ग्रॅमी पुरस्कारांचे आयोजन केले. या सोहळ्यामध्ये गायक टेलर स्विफ्ट, ऑलिव्हिया रॉड्रिगो, मायली सायरस आणि लॅना डेल रे यांनी यावर्षी अनेक ग्रॅमी पुरस्कार जिंकले. ग्रॅमीमध्ये गायिका मायली सायरसने तिच्या कारकिर्दीतील पहिला ग्रॅमी जिंकला. सोलाना इमानी रोवेने या वर्षीच्या नामांकनांमध्ये वर्चस्व राखले.
ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
सर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स: मायली सायरस (फ्लॉवर्स)
सर्वोत्कृष्ट अल्बम : SZA (SOS)
सर्वोत्तम कामगिरी: कोको जोन्स (ICU)
रॅप अल्बम: किलर माइक (मायकेल)
सर्वोत्कृष्ट आफ्रिकन संगीत परफॉर्मन्स: टायला (वॉटर)
पॉप ड्युओ/ग्रुप परफॉर्मन्स: एसझेडए, फोबी ब्रिजर्स (मशीनमधील भूत)
संगीत व्हिडिओ: बीटल्स, जोनाथन क्लाइड, एम कूपर (मी फक्त झोपतो)
जागतिक संगीत कामगिरी: झाकीर हुसेन, बेला फेक, एडगर मेयर (पश्तो)
पर्यायी संगीत अल्बम: बॉयजिनियस (द रेकॉर्ड)
ग्लोबल म्युझिक अल्बम: शक्ती (द मोमेंट)
वर्षातील निर्माता, नॉन-क्लासिकल: जॅक अँटोनॉफ
वर्षातील निर्माता, शास्त्रीय : अलेन मार्टन
सर्वोत्कृष्ट अभियंता अल्बम, शास्त्रीय : रिकार्डो मुटी आणि सिम्फनी ऑर्केस्ट्रा
सर्वोत्कृष्ट ब्लूग्रास अल्बम: मॉली टर्टल आणि गोल्डन हायवे (सिटी ऑफ गोल्ड)
सर्वोत्कृष्ट समकालीन वाद्य अल्बम : बेला फेक, झाकीर हुसेन, एडगर मेयर, राकेश चौरसिया
सर्वोत्कृष्ट जॅझ परफॉर्मन्स अल्बम: बिली चाइल्ड्स (द विंड ऑफ चेंज)
सर्वोत्कृष्ट जॅझ परफॉर्मन्स : समारा जॉय (टाइट)
सर्वोत्कृष्ट प्रगतीशील R&B अल्बम: SZA (SOS)