Gautami Patil Ghungaru Teaser Video : गेल्या अनेक महिन्यांपासून अख्खा महाराष्ट्रात ज्याची चर्चा सुरु आहे सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil Video)...डान्स कार्यक्रमातून गावोगावी पोहोचणारी गौतमी आता रुपरी परद्यावर झळकणार आहे. मराठीतील तिचा पहिल्या वहिल्या चित्रपट घुंरूग (Ghungroo) बद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. आज या चित्रपटाचा टीझर आऊट झाला आहे.
अॅक्शन, डान्स, थरार आणि नाट्याने भरलेला हा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. गौतमी पाटील हिचा इन्स्टाग्रामवर हा टीझर शेअर करण्यात आला आहे. तिच्या डान्सचे हजारो चाहते आहेत. आता तिच्या अभिनयाची जादू चाहत्यांवर पाहायला मिळणार आहे.
गौतमीने टीझर शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होतं आहे. एका चाहत्याने लिहिलं आहे की, ''गौतमी म्हटल्यावर सिनेमा पण सुपरहिट होणार, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात हा सिनेमा गाजणार, नाद करा पण गौतमीचा कुठं, सबसे कातील गौतमी पाटील.'' (Gautami Patil first marathi movie Ghungroo teaser released video viral on Social media)
या चित्रपटाचे चित्रिकरण सोलापूर, हंपीसह परदेशात झालं आहे. बाबा गायकवाड (Baba Gaikwad) दिग्दर्शत या चित्रपटात लोककलावंतांच्या आयुष्य दाखविण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून अख्खा महाराष्ट्रात फक्त गौतमीची चर्चा सुरु आहे. त्या एका व्हिडीओने गौतमीच्या आयुष्यात उलथापालथ केली. एका कार्यक्रमाच्या वेळी ती कपडे बदलत असतानाचा व्हिडीओ खराब मानसिकतेच्या व्यक्तीने काढला. त्यानंतर तो सोशल मीडियावरही व्हायरल केला. त्यानंतर गौतमी अस्वस्थ झाली होती.
नुकताच @theoddEngineer या युट्युब दिलेल्या मुलाखतीत तिने तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा मनाची अवस्थतेबद्दल सांगितलं. तिने तो व्हिडीओ सगळ्या पहिले आपल्या आईला पाठवलं. कारण इतर कोणी पाठल्यानंतर आईला धक्का बसू नये म्हणून गौतमीने पहिलेच या व्हिडीओची कल्पना आईला दिली होती. या विकृत घटनेनंतर व्हॅनिटी व्हॅन घेण्याची वेळ आली, असं गौतमीने सांगितलं.
गौतमीच्या डान्सचे लाखो चाहते असले तरी लोककलाकार त्याचा नृत्यावर आक्षेप घेतात. गौतमी जे नृत्य करते ती लावणी नाही. शिवाय ती अश्लील नृत्य करते अशी एका स्तरातून टीका होते. एवढंच नाही तर गौतमीच्या मानधनावरुनही तिच्यावर टीका होते आहे. प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर आणि ज्येष्ठ तमाशाकलावंत रघुवीर खेडकर यांनीही तिच्या मानधनावर आक्षेप घेतला आहे. लोककला लोककलाच राहिली पाहिजे, अशी अपेक्षा खेडकर यांनी व्यक्त केली आहे.