Gadar 2 ची हवा ओसरली? छे...स्वांतत्र्यदिनी विक्रमी कमाई करत गाठला 'इतक्या' कोटींचा पल्ला

Gadar 2 : Gadar 2 या चित्रपटानं आपली किमया कायम ठेवली आहे. सलग पाचव्या दिवशी हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. एव्हाना या चित्रपटानं 200 कोटींचा आकाडा हा पार केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 16, 2023, 12:30 PM IST
Gadar 2 ची हवा ओसरली? छे...स्वांतत्र्यदिनी विक्रमी कमाई करत गाठला 'इतक्या' कोटींचा पल्ला title=
August 16, 2023 | gadar 2 continues to win hearts of the audience collects highest box office collection at the box office

Gadar 2 Box Office Collection: Gadar 2 या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. सध्या हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर गाजत असून चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. काल 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी या चित्रपटानं विक्रमी कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या चित्रपटानं आतापर्यंत 228.98 कोटींची कमाई केली असून 11 ऑगस्ट त्याचदिवशी प्रदर्शित झालेल्या OMG 2 या चित्रपटालाही मागे टाकले आहे. त्यामुळे या चित्रपटानं यावर्षीच्या सर्वाधिक बॉक्स ऑफिसवर कमाई केलेल्या चित्रपटांच्या यादीत आपलं नावं कोरलं आहे. या चित्रपटासाठी थिएटरमध्ये प्रेक्षक हे गर्दी करत असून सलग पाचव्या दिवशी हाऊसफुल्ल शो सुरू आहेत. अनेकांना या चित्रपटाची क्रेझ वाटू लागली आहे. त्यातून काहींनी तर तारा सिंगप्रमाणे हातोडा घेत थिएटर गाठले आणि ते पकडून चित्रपट झाल्यानंतर नाचही सुरू केला होता. सोबत संपुर्ण देशात कुटुंबीय, मित्रपरिवार खासकरून तरूणवर्ग हा या चित्रपटासाठी गर्दी करतो आहे. 

या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. काल 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. काल या चित्रपटानं 55. 40 कोटी कमावले असून काल या चित्रपटानं सर्वाधिक गल्ला बॉक्स ऑफिसवर भरला आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा ही रंगलेली आहे. 

पहिल्या दिवशी या चित्रपटानं चांगली ओपनिंग केली होती. त्यामुळे हा चित्रपट सर्वत्र गाजत होता. पहिल्या दिवशी अक्षय कुमारच्या OMG 2 चित्रपटाला मागे टाकत Gadar 2 नं विक्रमी आकडा गाठला आणि पहिल्याच दिवशी 40.1 कोटी रूपये कमावले आहेत. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 43.08 कोटी रूपये कमावले आहेत. त्यामुळे विकेंडला या चित्रपटाला चांगलाच पुश मिळला होता. मिंटच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 7.43% टक्के कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 51.7 कोटी रूपयांची कमाई केली होती. चौथ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत -25.15 टक्क्यांची घट झाली होती. तेव्हा या चित्रपटानं 38.7 टक्के कमाई केली होती. 

स्वातंत्र्यदिनी केली विक्रमी कमाई 

स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सलग पाचव्या दिवशी 55.40 कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत 228.98 कोटी रूपयांची या चित्रपटानं कमाई केली आहे.