वरूण धवनचा 'ऑक्टोबर' 'या' मराठी सिनेमाची 'कॉपी'?

दिग्दर्शक सुजित सरकार हा त्याच्या हटके कामांसाठी ओळखला जातो. सध्या सुजितचा 'अक्टोबर' हा सिनेमा क्रिटिक्सकडून चांगली प्रशंसा मिळवत आहे. वरुण धवन हा प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटाभोवती आता नवा वाद रंगला आहे. 'ऑक्टोबर'  सिनेमा एका मराठी सिनेमाची कॉपी असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Updated: Apr 21, 2018, 10:26 AM IST
वरूण धवनचा 'ऑक्टोबर' 'या' मराठी सिनेमाची 'कॉपी'? title=

मुंबई : दिग्दर्शक सुजित सरकार हा त्याच्या हटके कामांसाठी ओळखला जातो. सध्या सुजितचा 'अक्टोबर' हा सिनेमा क्रिटिक्सकडून चांगली प्रशंसा मिळवत आहे. वरुण धवन हा प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटाभोवती आता नवा वाद रंगला आहे. 'ऑक्टोबर'  सिनेमा एका मराठी सिनेमाची कॉपी असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

काय आहे वाद? 

एका सोशल मीडियाच्या पोस्ट अनुसार, 'ऑक्टोबर' हा सिनेमा एका मराठी सिनेमाची कॉपी असल्याचा दावा करण्यात आला आहे. 'आरती - द अननॉन लव स्टोरी' या 2017साली रिलिज झालेल्या मराठी चित्रपटाची कॉपी असल्याचे सांगण्यात आले आहे. फिल्ममेकर हेमल त्रिवेदी यांनी याबाबत फेसबूकवर पोस्ट केली आहे. 

सुजित सरकार यांनी चित्रपटाच्या कहाणीसोबतच या चित्रपटातील काही सीन्स, लूक्सदेखील चोरल्याचा आरोप हेमल यांनी केला आहे. याप्रकरणी अनेक असोसिएशनकडे मदत आहे. मात्र कोणाकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ऑक्टोबर हा सिनेमा 13 एप्रिलला रिलीज झाला आहे. बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने 30 कोटींची कमाई केली आहे.