शाहीद कपूर काही 'अशा' अंदाजात शेअर केली 'गूड न्यूज'

मीरा आणि शाहिद कपूर ही बॉलिवूडमधील जोडी त्यांच्या चाहत्यांना नेहमीच कपल्स गोल्स देते. काही दिवसांपूर्वी मीरा पुन्हा आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी शाहीद कपूरने खास पोस्ट केली आहे.  

Updated: Apr 21, 2018, 08:08 AM IST
शाहीद कपूर काही 'अशा' अंदाजात शेअर केली 'गूड न्यूज'  title=

मुंबई : मीरा आणि शाहिद कपूर ही बॉलिवूडमधील जोडी त्यांच्या चाहत्यांना नेहमीच कपल्स गोल्स देते. काही दिवसांपूर्वी मीरा पुन्हा आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी शाहीद कपूरने खास पोस्ट केली आहे.  

इंस्टाग्रामवर शेअर केला फोटो 

शाहीद कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक खास फ़ोटो शेअर केला आहे. त्यामध्ये मिशा म्हणजेच मीरा- शाहिदच्या मुलीचा एक फोटो शेअर करताना सोबत 'बिग सिस्टर' असे कॅप्शन लिहलेला फोटो शेअर केला आहे. 

 

 

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

 

लवकरच येणार नवा पाहुणा  

शाहीद आणि मीरा यांना दुसरे बाळ हवे असल्याची इच्छा यापूर्वी व्यक्त केली होती. आता लवकरच त्यांच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार आहे. यावर खुद्द शाहीद कपूरने शिक्कामोर्तब केल्याने त्यांच्या चाहत्यांनीही या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अवघ्या तासाभरात शाहीद कपूरच्या या पोस्टवर 2 लाखाहून अधिक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 

 शाहीद आणि मीरा  

 करिना कपूरसोबत रिलेशनमध्ये असलेल्या शाहीद कपूर आणि करिनामध्ये दुरावा आला. शाहीद कपूर आणि मीरा राजपूत जुलै 2015 साली विवाहबंधनात अडकले. त्यानंतर 26 ऑगस्ट 2016 रोजी  मीशा त्यांच्या आयुष्यात आली.