मॉडेलचा बलात्कार केल्याप्रकरणी प्रसिद्ध फोटोग्राफरविरुद्ध गुन्हा दाखल

बॉलिवूडच्या प्रसिद्ध फोटोग्राफरवर मुंबईच्या एका मॉडेलने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. 

Updated: May 30, 2021, 12:00 PM IST
मॉडेलचा बलात्कार केल्याप्रकरणी प्रसिद्ध फोटोग्राफरविरुद्ध  गुन्हा दाखल  title=

मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध फोटोग्राफरवर मुंबईच्या एका मॉडेलने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. अंधेरी येथे राहणाऱ्या 28 वर्षीय मॉडेलने वांद्रे पोलीस ठाण्यात बलात्कार आणि लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियनसह आठ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहेत. यामध्ये  प्रसिद्ध चित्रपटाच्या निर्मात्याचा मुलगा, बॉलिवूड टॅलेंट मॅनेजर आणि एका निर्मात्याचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता या प्रकरणी तपासणी सुरू आहे. 

यापूर्वी #metoo मोहिमे अंतर्गत सुद्धा लैंगिक शोषण आणि बलात्काराचा आरोप केला होता. पण आता मॉडेलने तक्रार दाखल केली आहे. 12 एप्रिल रोजी तक्रारदार मॉडेलने सोशल मीडिया पोस्ट लिहून दहशत निर्माण केली. बॉलिवूडमध्ये काम मिळवून देवू असं म्हणतं लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला.

लैंगिक शोषण आणि बलात्कारप्रकरणी मॉडेलने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही पत्र दिलं होतं. मॉडेलने फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियन विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात 26 मे रोजी एफआरआय दाखल केली. मॉडेलच्या आरोपांनंतर फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियनच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 

फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियनने अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, विराट कोहली अशा मोठ्या सेलिब्रिंटींसोबत काम केलं आहे. शिवाय त्याने अनेक मोठ्या ब्राण्ड्ससाठी देखील काम केलं आहे. शिवाय फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियन अंडर व्हाटर फोटोग्राफीसाठी देखील प्रसिद्ध आहे.