याला म्हणतात मराठमोळे संस्कार! रितेश आणि जेनेलियाची ही शिकवण प्रत्येक पालकांसाठी आहे महत्त्वाची

रितेश आणि जेनेलियाच्या मुलांची ही गोष्ट नेटिझन्सनाही भावते, प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना शिकवावी अशी गोष्ट सोशल मीडियावरही होतंय कौतूक

Updated: Jan 3, 2023, 01:46 PM IST
याला म्हणतात मराठमोळे संस्कार! रितेश आणि जेनेलियाची ही शिकवण प्रत्येक पालकांसाठी आहे महत्त्वाची title=

Entertainment News : बॉलिवूडमधील (Bollywood) लाडका मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपले पाय भक्कम रोवले आहेत. रितेश आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा (Genelia D'Souza) ही जोडी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे, रितेश-जेनेलियाचं (riteish-Genelia) प्रेम आणि त्यानंतर लग्न हा प्रवासही जबरदस्त आहे. या जोडीला आयुष्यभरासाठी एकत्र आणलं ते 'तुझे मेरी कसम' या हिंदी चित्रपटाने. 

रितेश-जेनेलिया परफेक्ट कपल
रितेश आणि जेनेलिया एकमेकांना डेट करत असल्याचा कोणालाही पता लागू दिला नव्हता. अखेर 9 वर्षांच्या अफेअरनंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली. 2003 मध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली. सुरुवातील जेनेलिया रितेशला घमेंडी समझत होती. पण यानंतर तिचा गैरसमज दूर झाला. त्यानंतर दोघं चांगले मित्र बनले आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. रितेश आणि जेनेलिया ही जोडी जितकं परफेक्ट कपल मानलं जातं, तितकेच ते आदर्श पालक म्हणूनही ओळखले जातात.

रितेश-जेनेलिया आदर्श पालक
बॉलिवूडचे अभिनेता-अभिनेत्री म्हटलं की त्यांचे अनेक ठिकाणी फोटो काढले जातात, इतकंच काय तर स्टार किड्स (Star Kids) म्हणून त्यांच्या मुलांवरही नेहमीच कॅमरे रोखलेले असतात. रितेश-जेनेलिया जेव्हा आपल्या मुलांसोबत बाहेर पडतात तेव्हा साहजिकच त्यांचे फोटो काढण्यासाठी अनेक कॅमरे सरसावले असतात. तसंच सर्वच स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियावर (Socia Media) व्हायरल होत असतात. पण रितेश-जेनेलियाच्या मुलांचे फोटो यांच्यापेक्षा थोडे हटके असतात, याला कारणही तसंच आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

मुलांना दिलीय अशी शिकवण
रितेश आणि जेनेलियाच्या मुलांची नावं राहिल (Rahyl) आणि रियान (Riaan) अशी आहेत. जेव्हा त्यांचे फोटो काढले जातात तेव्हा राहिल आणि रियान आवर्जून हात जोडतात आणि कॅमेरामनना थँक्यू म्हणतात. रितेश आणि जेनेलियाने आपल्या मुलांना ही शिकवण दिली आहे. याचं कारणही रितेशने सांगितलं आहे. आपण आपल्या कामामुळे ओळखले जातो आणि आपल्या कामामुळेच आपले फोटो काढले जातात, पण केवळ तुम्ही आमची मुलं म्हणून तुमचेही फोटो काढले जातात. तुमचे फोटो काढण्यासारखं आता तुम्ही काहीच केलेलं नाही. त्यामुळे फोटो काढताना फोटोग्राफरला हात जोडून थँक्यू म्हणा अशी शिकवण रितेश आणि जेनेलियाने आपल्या मुलांना दिली आहे. 

हे ही वाचा : WhatsApp ग्रुपमधून काढलं, Admin ला बेदम मारहाण करत जीभच कापली... पुण्यातील धक्कादायक घटना

मुलांशी मराठी भाषेत संवाद
रितेश आणि जेनेलियाने राहिल आणि रियानला मातीशी जोडून ठेवलं आहे. जेनेलिया ख्रिश्चन असली तरी आपल्या मुलांबरोबर ती मराठीतच बोलते. रितेशच्या घरात मराठी भाषेतच एकमेकांशी संवाद साधला जातो आणि हेच संस्कार त्यांच्या मुलांवरही आहेत. हल्ली मराठी कुटुंबातदेखली इंग्रजी भाषेत मुलांशी संवाद साधण्याचा कल दिसून येतो. पण रितेश-जेनेलिया याला अपवाद आहेत. रितेश आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपले आणि मुलांचे रिल्स शेअर करत असतो. यातदेखील मुलं अस्खलित मराठी बोलताना दिसतात. दसऱ्याच्या दिवशी रितेशने आपल्या मुलांचा एक व्हिडिओ शेअर केला होता यात राहिल आणि रियान गायत्रीमंत्र म्हणताना दिसली होती.